| | | |

नसांमधील ब्लॉकेजेस खोलण्यासाठी करा आयुर्वेदिक उपाय; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। शरीरातील नसांनमध्ये ब्लॉकेजेस असणे ही एक गंभीर समस्या आहे. त्यामुळे जर ब्लॉकेजेस हृदयाच्या मुख्य धमनी वा शिरांमध्ये असतील तर आरोग्यास मोठा धोका असण्याची शक्यता असते. ब्लॉकेजेसचा त्रास अत्यंत वेदनादायी असतो. जर आपणही नसांच्या ब्लॉकेजेसचा त्रास अनुभवत असाल तर मुख्य म्हणजे घाबरू नका. आयुर्वेद अशी गोष्ट आहे ज्यात प्रत्येक आजारावर अत्यंत जालीम आणि रामबाण असे उपाय आहेत. ज्यांचा अवलंब करून आपण आजारांवर मात करू शकतो. तर जाणून घेऊयात शरीरातील ब्लॉक झालेल्या नसा खोलण्याचे आयुर्वेदिक उपाय:-

१) अर्जुन वृक्षाची साल – अर्जुन वृक्षाच्या सालीचे आयुर्वेदात मोठे महत्व आहे. यामध्ये रक्तवाहिकांतील ब्लॉकेजस मोकळे करण्याचे गुणधर्म असतात. अर्जुन वृक्षाची साल दररोज २ कप पाण्याचे १ कप पाणी होईपर्यंत उकळून घ्या. हे पाणी पिण्याने शरीराला लाभदायक फायदा मिळतो.

२) नियमित व्यायाम व योगा करा – व्यायाम आणि योगसाधना यांमूळे होणारे विशेष फायदे आपण सारेच जाणतो. नियमित व्यायाम व योगासने केल्यामुळे शरीर आनंदी, उत्साही आणि तितकेच प्रफुल्लित होते. मुख्य म्हणजे, नियमित व्यायाम आणि योगामुळे शरीराच्या विविध भागाला रक्तपुरवठा सुरळीत होतो. तसेच रक्ताभिसरणाचा वेग देखील वाढतो. त्यामुळे छोटे – मोठे ब्लॉकेजेस कमी करण्यासाठी मदत होते.

३) फॅटयुक्त आहाराचे सेवन टाळा – अत्याधिक फॅट असलेल्या अन्न पदार्थांचे सेवन केल्याने शरीराला रक्त पुरवठा करणाऱ्या धमन्या आणि शिरांमध्ये गंज निर्माण होऊन नसांचे ब्लॉकेजेस वाढतात. म्हणून काळजी घेणे गरजेचे असल्यामुळे फॅटयुक्त आहार टाळल्यास ब्लॉकेजची समस्या जाणवत नाही.

४) दूध आणि लसूणचे सेवन करा – लसूण आणि दुध अशा गोष्टी आहेत, ज्याचा वापर आपण केल्यास ब्लॉकेजेसमुळे निर्माण झालेल्या वेदना कमी होतात. शिवाय अतिशय कमी वेळात ब्लॉक झालेल्या नसा पूर्णपणे खुलतात. आयुर्वेदामध्ये लसूण म्हणजे अमृत असे म्हटले आहे. कारण शरीरातील नसा खोलण्याशिवाय आहारामध्ये लसूण वापरल्याने सर्दी, खोकला, घसा खवखवणे, सायनस अश्या आजारावरही लाभदायक फायदा होतो.

५) आहारात भोपळ्याचा समावेश करा – भोपळ्यामध्ये विटामिन्स तसेच पोषक घटक अधिक असतात. ज्यामुळे शरीरातील टाकाऊ घटक शरीराबाहेर काढण्यासाठी मदत होते. त्यामुळे रोजच्या आहारात भोपळ्याचा समावेश करणे अत्यंत लाभदायक आहे. रोज सकाळी व संध्याकाळी भोपळ्याचा ज्यूस पिण्याने किंवा भोपळ्याचे सुप आणि भाजी खाल्ल्याने शरीराला याचा खूप फायदा होतो. तसेच शरीरातील रक्तवाहिका शुद्ध होतात आणि यामुळे ब्लॉकेजेस कमी होतात.

६) बदामाचे सेवन – बदामामध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन्स आणि मिनरल्स असतात. ज्याची आपल्या शरीराला गरज असते. त्यामुळे दररोज रात्री ५ ते ७ बदाम भिजवून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी खा. असे नियमित बदाम खाल्ले असता शरीराला विविध फायदे होतात आणि मुख्य म्हणजे शरीराच्या विविध ब्लॉक नसा देखील खुलतात.