Ayurvedic Tea for Headache

Ayurvedic Tea | अपचन, डोकेदुखी होईल चुटकीसरशी दूर, सकाळी प्या ‘हा’ चहा

Ayurvedic Tea | हिवाळा हा ऋतू चालू झाला की, या सोबत अनेक मोठ्या समस्या देखील येतात. हिवाळ्यामध्ये सर्दी मायग्रेन केस करण्याच्या अनेक समस्या होत असतात. त्याचप्रमाणे या ऋतूत अनेक पदार्थ खाऊशी वाटतात. त्यामुळे आपल्या तब्येतीत देखील खूप मोठा परिणाम होतो त्याचप्रमाणे ऍसिडिटी वजन वाढणे यांसारख्या समस्या देखील समोर येतात.

मित्रांनो जर तुम्हाला देखील हिवाळ्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुमच्या दिवसाची सुरुवात फक्त एका पेयाने करा त्यानंतर तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील. आता त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण पाहूया. यासाठी दोन ग्लास पाणी, सात ते आठ कढीपत्त्याची पाने, तीन सेलरी पाने, एक चमचा धने, एक चमचा जिरे, एक वेलची, ठेचून एक इंच आले किसलेले.

हेही वाचा- Foods For Glowing Skin | चमकदार त्वचा मिळवायची असेल तर आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश नक्की करा

पेय बनवण्याची पद्धत | Ayurvedic Tea

 • एका पातेल्यात पाणी घ्या आणि ते उकळू द्या.
 • पाण्याला उकळी येतात त्यामध्ये कढीपत्ता धने जिरे वेलची आणि किसलेल्या आले टाका.
 • त्यानंतर पाच मिनिटे ते पाणी उकळू द्या.
 • आणि त्यानंतर ते पाणी गाळून घ्या.

हे पेय पिल्याने काय फायदा होतो.

 • या पेयामध्ये आपण अनेक पदार्थ वापरत असतो त्या प्रत्येक पदार्थाची एक वेगळे वैशिष्ट्य आहे ते आता आपण जाणून घेऊया.
 • कढीपत्ता – कढीपत्ता हे केस गळणे थांबवते, वजन नियंत्रित ठेवते, तसेच साखरेची पातळी कमी करते आणि हिमोग्लोबिन सुधारणा देखील मदत करते.
 • सेलरी पाने – ही पाने सूज येणे, अपचन, सर्दी, मधुमेह, दमा त्याचप्रमाणे वजन कमी करण्यास खूप उपयुक्त आहे.
 • धने- धने खाल्ल्याने चयापच्य सुधारण्यास मदत होते तसेच मायग्रेन, थायरॉईड आणि हार्मोनल असंतुलन देखील सुधारते.
 • जिरे- यामुळे साखर वजन कमी होणे, आम्लपित्त, मायग्रेन कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर होते.
 • वेलची- मोशन सिकनेस, मळमळ, मायग्रेन, उच्च रक्तदाब तसेच केस आणि त्वचेसाठी वेलची खूप उपयुक्त आहे.
 • आलं- आल्यामध्ये अनेक घटक असतात त्यामुळे अपचन गॅस वजन कमी होणे यांसारख्या समस्या दूर होतात.

यामुळे तुम्ही सकाळी दुधाऐवजी किंवा चहा ऐवजी या पेयाने तुमच्या दिवसाची सुरुवात केली, तर हिवाळ्यात काय परंतु पुढे सगळ्या ऋतूंमध्ये तुमची रोगप्रतिकारशक्ती देखील वाढेल आणि तुम्ही निरोगी जीवन जगू शकाल.