PCOD
| | |

(आ) PCOD’च्या समस्येवर घरगुती उपाय आणि सामान्य वैद्यकीय उपचार; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। पॉली सिस्टीक ओव्हरीयन डिसीज (PCOD) यालाच पॉली सिस्टीक ओव्हरी डिसीज म्हणतात. हार्मोन्समध्ये असंतुलन झाल्यास PCOD’ची समस्या पुढे येते. या स्थितीमध्ये अंडाशयाचा आकार खूप मोठा होतो आणि त्यात सिस्ट तयार होऊ लागतात. PCOD हा एक हार्मोनल आजार आहे. डॉक्टर सांगतात कि, हा आजार वंधत्व देणारा नाही. मात्र गंभीर आहे. त्यामुळे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपण (अ) या भागात PCOD म्हणजे काय आणि त्याची कारणे तसेच लक्षणे पाहिली. यानंतर आता (आ) या भागात आपण घरगुती उपाय आणि सामान्य वैद्यकीय उपचार जाणून घेऊ.

० PCOD’च्या समस्येवर घरगुती उपाय

० PCOD’च्या समस्येवर सामान्य वैद्यकीय उपचार

– गर्भ निरोधक गोळ्या आणि इतर औषधे मासिक पाळी नियमित करण्यास आणि केसांची वाढ, मुरुमांसारख्या लक्षणांवर उपचार करू शकतात.

 1. गर्भ निरोधक गोळ्या –
  ० शरीरातील हार्मोन्स नियंत्रित करतात.
  ० ओव्हुलेशन नियमित होते.
  ० त्वचेवर केसांची होणारी वाढ थांबतात.
  ० एंडोमेट्रियल कर्करोगापासून संरक्षण करते.
 2. मेटफॉर्मिन – मेटफॉर्मिन मधुमेहा प्रकार २’चा उपचार करण्यासाठी वापरले जाणारे एक औषध आहे. हे औषध इन्सुलिनची पातळी सुधारते आणि PCOD’वर देखील उपचार करते.
 3. क्लोमीफेन – क्लोमीफेन (क्लोमिड) हे एक प्रजनन औषध आहे ज्यामुळे PCOD ने त्रासलेल्या महिलांना गर्भवती होण्यास मदत होते.
 4. आहार आणि व्यायामात बदल – आहार आणि व्यायामामध्ये बदल केल्यासही PCOD मध्ये बराच फायदा होतो. यामुळे वजन कमी होते, रक्तातील साखर कमी होते आणि मासिक पाळीदेखील सामान्य होते.