| |

(आ) पॅनिक अटॅक टाळण्यासाठी अशी घ्या खबरदारी; जाणून घ्या उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन। जगभरात असे अनेक लोक आहेत ज्यांना कोणत्याही गोष्टींमध्ये सगळ्यात जास्त भीती वाटते ती मृत्यूची. अश्या लोकांना साधी शाहिनक आली तरीही मेलो मेलो मेलो असे वाटते. याशिवाय महिलांमध्ये सगळ्यात महत्वाची दिसून येणारी बाब म्हणजे एखादा किडा वा कीटक पाहून त्या अश्या प्रतिक्रिया देतात जणू काय तो लहानगा कीड त्यांना गिळंकृतच करेल. त्यामुळे असा एखादा किडा अचानक त्यांच्या समोर आलाच तर त्या फारच घाबरून जातात. अगदी काहींचा तर श्वासही काही वेळासाठी थांबतो. अशाच कोणत्याही स्थितीला ‘पॅनिक अटॅक’ असे म्हणतात. जेव्हा ही परिस्थिती उद्भवते तेव्हा मृत्यूची भीती व्यक्तीच्या मनात घर करून बसते. ही भीती त्या व्यक्तीच्या मनावर वर्चस्व गाजवते. मुळात पॅनीक अटॅक कुठेही आणि कधीही येऊ शकतो. त्यामुळे याबद्दल आपल्याला प्रत्येकाला माहिती असणे गरजेचे आहे. आपण (अ) भागामध्ये पॅनिक अटॅकची लक्षणे आणि कारणे जाणून घेतल्यानंतर आज पॅनिक अटक टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी आणि उपचार जाणून घेऊया.

० पॅनिक अटॅक टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी –

१) संबंधित व्यक्तीने कॅफिन अर्थात चहा कॉफीसारख्या पेयांचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.

२) संबंधित व्यक्तीने जास्त प्रमाणात दारू पिऊ नये.

३) संबंधित व्यक्तीस कोणत्याही गोष्टीचा अधिक ताण वा तणाव वाटत असेल तर त्याने मन वळवण्यासाठी कोणतेही आपल्या आवडीचे काम निवडावे.

४) संबंधित व्यक्तीने एकटेपणा टाळावा आणि नैराश्यावर मात करण्यासाठी कुटुंबातील सदस्य तसेच मित्र- मैत्रिणींना भेटावे.

५) कोणतीही वेदनादायक घटना घडल्यास त्या परिस्थितीत स्वतःला भावनिकरीत्या व्यवस्थित हाताळण्याचा प्रयत्न करा.

६) याशिवाय पॅनीक अटॅक हाताबाहेर असल्यास तो टाळण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

 

० पॅनीक अटॅक’ वर वैद्यकीय आणि घरगुती उपचार खालीलप्रमाणे:-

– वैद्यकीय उपचार

१. डॉक्टर रुग्णाला तोंडी प्रश्न विचारून समस्या निवारण करतात.

२. लक्षणांशी संबंधित माहितीसाठी कुटुंबातील सदस्यांची माहिती घेता येते.

३. हृदय तपासणी केली जाते आणि यावरून हृदयाचे ठोके ओळखतात.

४. डॉक्टर रक्त तपासणीचा सल्ला देऊ शकतात.

५. सर्व निकषानंतर प्रभाव पाहून डॉक्टर मानसिक आरोग्य चाचणीची शिफारस करू शकतात.

– घरगुती उपाय

१. ध्यानधारणा – पॅनिक अटॅकची स्थिती मानसिक आरोग्यावर परिणाम करते. यासाठी मेडिटेशन अर्थात ध्यान धारणा उत्तम पर्याय आहे. यामुळे व्‍यक्‍ती केवळ भावनांवर नियंत्रण ठेवत नाही तर चिंता, तणाव देखील दूर ठेवते.

२. नियमित व्यायाम – पॅनीक अटॅकच्या स्थितीवर मात करण्यासाठी व्यायाम करणे फायदेशीर आहे. कारण व्यायामामुळे एंडोर्फिन हार्मोन्सची पातळी वाढते. परिणामी व्यक्तीचा मूड सुधारतो. त्यामुळे एखादी व्यक्ती तणावाखाली असेल तर नियमित हलका व्यायाम करून तो तणाव दूर करता येतो.

३. दीर्घ श्वासोच्छ्वास – दीर्घ श्वासोच्छवास घेतल्यास पॅनीक अटॅकचे गंभीर परिणाम कमी केले जाऊ शकतात. कारण पॅनिक अटक हि समस्या बहुतांशी तणावामुळे होते. म्हणून दिनचर्येत दीर्घ श्वास घेण्याशी संबंधित व्यायाम नक्की करा. दरम्यान दीर्घ श्वास घेताना मन आणि डोकं शांत ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करा. यामुळे केवळ तणावच नाही तर व्यक्तीचा मूडदेखील सुधारतो.

४. लॅव्हेंडर ऑइल – लॅव्हेंडर ऑईलचा वापर तणाव, नैराश्य, चिंता यांपपासून मुक्तता देण्यास्तही जातो. जसे कि आपण पाहिले तणाव, नैराश्य आणि चिंता यामुळे पॅनीक अटॅक येतो. तर संबंधित व्यक्तीने लॅव्हेंडर ऑइल इनहेलरमध्ये टाकून त्याचा वास घ्यावा. यामुळे परिस्थितीवर नियंत्रण ठेवता येईल.

५. डॉक्टरांचा सल्ला – कोणत्याही घरगुती उपायांनी पॅनीक अटॅकच्या त्रासापासून आराम मिळू शकतो. मात्र जर हि समस्या अधिक गंभीर होत असेल आणि बऱ्याच काळापासून चालू असेल तर आपल्या डॉक्टरांशी याविषयी सविस्तर बोलून मार्ग काढा.