| |

वारंवार तोंडाची चव जाऊन कडवटपणा येतो? मग जाणून घ्या कारणे आणि उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन। असं खूपवेळा होत कि, आपण कडू काय गॉड पदार्थ देखील खाल्लेला नसतो मात्र तरीही तोंडात काद्वाडपणाची चव येते आणि मग खाल्ला जाणारा प्रत्येक पदार्थ अगदी कारल्यासारखा कडू कडू वाटतो. पण असं नक्की का होत? हे आपल्याला ठाऊक नसल्यामुळे आपण नसते तर्क वितर्क लावत बसतो. म्हणून आज आम्ही तुम्हाला तोंडाच्या कडवटपणाची कारणे सांगणार आहोत आणि इतकेच नव्हे तर त्यासोबत त्यावर करावयाचे उपाय देखील सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

१) तोंडाने श्वास घेणे – अनेकांना बारमाही सर्दीचा त्रास असतो. यात नाक बंद झाल्यामुले त्यांना तोंडावाटे श्वास घेवा लागतो आणि त्यामुळे तोंड कोरडे पडते आणि तोंडाला कडवट चव येते.
* उपाय – पुरेसा आराम करा. तोंडात आल्याचा मधात घोळवलेला तुकडा ठेवा किंवा लवंग चघळा.

२) श्वसनमार्गात इन्फेक्शन – खोकला आणि ताप यांसारख्या संसर्गजन्य आजारामुळे पदार्थांची चव लागत नाही. त्यामुळे काहीवेळा तोंडाला कडू चव येते.
* उपाय – या आजारांदरम्यान निर्माण होणाऱ्या श्वसनमार्गातील इन्फेक्शन दूर झाल्यानंतर तोंडाला पुन्हा चव येते. मात्र खोकला किंवा ताप असताना तोंडाची स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे.

३) डिहायड्रेशन – डिहायड्रेशनमुळेसुद्धा तोंडाची चव जाऊन कडवटपणा येऊ शकतो. तहान लागल्याने आणि तोंड सुकल्याने या समस्या प्रभावी होतात.
* उपाय – यासाठी दिवसभर पुरेसे पाणी प्या. तज्ज्ञांच्या मते, डिहायड्रेशन होऊ नये यासाठी किमान ७ ते ८ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे.

४) तोंडाची स्वच्छता न राखणं – तोंड स्वच्छ न ठेवल्याने जिभेवर मृत पेशी आणि बॅक्टेरिया जमा होऊन राहतात. परिणामी जिभेच्या चवीवर फरक पडतो आणि तोंडाला कवटपणा येतो.
* उपाय – तोंडाच्या स्वच्छतेसाठी दातांसह, हिरड्या आणि जीभ देखील स्वच्छ करा. याकरिता दंतमंजन किंवा मिठाचा वापर करावा.

५) अ‍ॅसिडीटी – जिभेला कडू चव येण्यास अ‍ॅसिडीटीची समस्या हे एक मुख्य कारण आहे. पोटातील अ‍ॅसिड किंवा पोटातील इतर घटक अन्ननलिकेत अडकल्याने किंवा पुन्हा आल्याने तोंडाची चव कडू होते.
* उपाय – अति गोड, मसालेदार पदार्थ कमी खाणे. व्यसनांपासून दूर राहणे. लिंबू पाणी प्यायल्याने ऍसिडिटीपासून आराम मिळेल.

६) दातांच्या समस्या – तोंडाच्या अस्वच्छतेमुळॆ दातांच्या अनेक समस्या उदभवतात. त्यामुळे दातांच्या समस्या आणि हिरड्यांच्या आजाराची लक्षणं तोंडात कडू चव निर्माण करतात. त्यामुळे तोंडाला कडू चव येत असेल, तर दातांच्या डॉक्टरांना दाखवा. त्यामुळे दात आणि हिरड्यांच्या आजारांचे निदान होईल.
* उपाय – नियमित दातांची काळजी घ्या, जसे की ब्रश करणे, फ्लोसिंग आणि अँटीबैक्टीरियल माउथवॉश वापरणे.

७) मज्जासंस्थेत बिघाड (Nervous system) – काही वेळा जिभेतील मज्जा तंतूना हानी पोहोचल्याने लाळग्रंथींना संसर्ग होतो. परिणामी, व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे तोंडाला कडवटपणा येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला कडवट चव लागत असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
* उपाय – संत्र, लिंबू यासारखे आंबटपदार्थ खाल्ले असता, जिभेवरील कडवटपणा दूर होईल.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *