| |

सातूचं पीठ म्हणजे सर्व वयोगटासाठी सुपर फूड; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। बाळ लहान असताना त्याला दात येत नाहीत तोपर्यंत त्याला पोषण मिळावे म्हणून नाचणीचे सत्त्व किंवा सातूच्या पिठाची भरड भरवली जाते. कारण सातुचं पीठ म्हणजे पोषक घटकांचा खजिना आहे. यात वेगवेगळी धान्यं भाजून ती गार करून दळली जातात. यामुळे सातूच्या पिठात मोठ्या प्रमाणावर फायबर आणि विविध पोषणमूल्य आढळतात. जसे कि फायबर, कर्बोदकं, प्रथिनं, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे घटक सातूच्या पिठात मोठ्या प्रमाणावर असतात. सातुच्या पिठातील या गुणधर्मांमुळेच सातुच्या पिठाला ‘सुपर फूड’ म्हटलं जातं. मुख्य म्हणजे सातूचं पीठ खाण्यासाठी कोणत्याही वयाची मर्यादा नाही. कारण हे प्रत्येक वयोगटातील व्यक्तीसाठी पोषक आहे.

० सातुच्या पिठाचे फायदे :-

१) मुलांची वाढ – मुलांच्या वाढीसाठी सातूचं पीठ फायदेशीर आहे. कारण यात प्रथिनं, ‘अ’ जीवनसत्त्व, कर्बोदकं, खनिजं आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतं. हे सर्व घटक मुलांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

२) मधुमेहींसाठी फायदेशीर – सातुचं पीठ हे लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड आहे. यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी हे खाल्लं तर त्यांच्या रक्तातील साखर, रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.

३) पोटाला आराम – पोटासंबंधित कोणत्याही समस्येसाठी सातूचं पीठ रिकाम्या पोटी घेणे फायद्याचे ठरते. कारण ययात आढळणारे फायबर पचन क्रिया सुधारते. तसेच्या सातुच्या पिठातील मीठ, लोह आणि फायबर हे गुणधर्म पोटाच्या समस्या बर्‍या करण्यास मदत करतात आणि पोट स्वच्छ करण्यासही मदतयुक्त ठरतात.

४) वजनावर नियंत्रण – सातुच्या पिठात प्रथिनं आणि फायबर भरपूर असल्यामुळे हे सुपर फूड म्हणून ओळखले जाते. शिवाय हे पीठ आपल्या पचनक्रियेला मजबूत करते. याशिवाय सातूचे सेवन केल्यास दिवसभर उत्साही आणि ताजतवानं वाटतं. तसेच यातील फायबरमुळे पोट भरपूर वेळ भरलेलं राहतं आणि इतर काही खाण्याची इच्छा होत नाही. परिणामी वजन नियंत्रणात राहते.

० सातू खाण्याचे नियम

१) जेवल्यानंतर कधीही सातुचं पीठ खाऊ नये.

२) सातू पौष्टिक असलं तरी ते कमी प्रमाणात सेवन करणे योग्य आहे. अतिरेक नको.

३) सातुचं पीठ खाताना मधेमधे पाणी पिऊ नये.

४) रात्रीच्यावेळी सातूचं पीठ खाऊ नये.

० सातुचं पीठ कसं खावं?
– सातुचं पीठ गुळाच्या पाण्यात भिजवून त्याचं गोड सरबत किंवा थोडं मीठ आणि जिरे घालून त्याचे मिश्रण बनवून खावे. याशिवाय सातुच्या पीठाचे लाडू, एनर्जी बार, पराठे, धिरडे करता येतात.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *