| | | |

हिवाळ्याच्या दिवसात तुळशीचं पाणी म्हणजे इम्युनिटी बूस्टर; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। तुळशीचे हिंदू धर्मात एक पवित्र स्थान आहे. यामुळे घराघरात तुळशीचे पूजन केले जाते. तर वेदपुराण आणि आयुर्वेदात तुळशीचे अनन्यसाधारण महत्व सांगण्यात आले आहे. आयुर्वेदात तर तुळशीला अत्यंत बहुगुणी औषधी म्हणून स्थान दिलेले आहे. याचे कारण म्हणजे तुळस आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवण्याची क्षमता राखते.

मित्रांनो हिवाळ्याच्या दिवसात रोगप्रतिकारक शक्ती कमी आणि पोटाच्या समस्या जास्त होतात. यासाठी अत्यंत सोप्पा आणि गुणकारी उपाय म्हणजे तुळस. होय. तुळशीची पाने पिण्याच्या पाण्यात टाकून ठेवा आणि हे पाणी प्या. यामुळे अगदी लहनातल्या लहान आजारापासून मोठ्यातल्या मोठ्या आजारापासून सुटका होते. मग सर्दी असो खोकला असो किंवा ताप… अगदी सहज हे आजार दूर होतात. इतकेच नव्हे तर मधुमेहाच्या रुग्णांनाही याचा लाभ होतो.

० हिवाळ्यात तुळशीचे पाणी पिणे फायदेशीर कसे?
– हिवाळ्यात तुळस घातलेले पाणी फायदेशीर आहे कारण, तुळशीमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म समाविष्ट असतात. यामुळे आपली रोगप्रतिकार क्षमता मजबूत राहते आणि कोणत्याही संसर्गापासून आपला बचाव होतो. शिवाय रोज तुळशीच्या पानांचं सेवन केल्यास शरीरातील अपायकारक घटक निघून जातात. यासोबतच, तुळशीमूळे शरीराचे तापमानही नियंत्रणात राहते. याशिवाय तुळशीच्या पानांचं सेवन केल्यानं स्थूलपणाही कमी होतो आणि वाईट कोलेस्टेरॉल वाढत नाही. पोटाशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास तुळशीचं पाणी प्यायल्यानं त्यावर गुण येतो.

० तुळशीचा वापर :-

१) पिण्याच्या पाण्यामध्ये तुळशीच्या काड्या, तुळशीची पाने आणि तुळशीच्या बिया घालून ठेवाव्या आणि हेच पाणी प्यावे. यामुळे शरीराच्या आतील अपायकारक घटक विरघळून लघवीवाटे निघून जातात.

२) तुळशीची पाने हातावर चोळून किंवा हाताने तोडून रोजच्या चहात वा कोणत्याही काढ्यामध्ये मिसळल्यास इतर फायद्यांसोबत पचनासही मदत होते.

३) तुळशीची पानं नारळपाणी आणि लिंबाचा रस यासोबत मिसळून पिता येईल.

४) आम्लपित्त होत असेल तर, दररोज २ ते ३ तुळशीची पानं चावून खा.

० रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी पिण्याचे फायदे खालीलप्रमाणे:-

१) तुळशीचे पाणी रिकाम्या पोटी प्यायल्यास संसर्गजन्य विषाणूंपासून संरक्षण होते.

२) सर्दी, खोकला, ताप आणि घसादुखीपासून आराम मिळतो.

३) मधुमेहाच्या रुग्णांनी तुळशीच्या पाण्याचे सेवन केल्यास साखरेची पातळी निश्चितच नियंत्रणात रक्त येईल.

४) शरीरातून विषारी आणि शरीरास अपायकारक पदार्थ शरीराबाहेर काढून टाकले जातात.

५) रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

६) पोटाशी आणि पचनाशी संबंधित समस्या दूर राहतात.

७) बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

८) लूज मोशनच्या समस्येपासून त्वरित आराम मिळतो.