| |

गरम पाण्यापेक्षा थंड पाण्याने अंघोळ करणे अधिक लाभदायक; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेक लोकांना गरम पाण्याशिवाय अंघोळ करणे म्हणजे एखादा मोठा टास्क वाटतो. बहुतेकदा हिवाळ्याच्या किंवा पावसाच्या ऋतूत जवळपास सगळेच लोक गरम पाण्याने आंघोळ करतात. पण काही लोक असेही आहेत जे ऊन, पाऊस, थंडी, गारा काहीही असले तरीही थंड आणि फक्त थंडच पाण्याने अंघोळ करतात. आता तुम्ही म्हणाल छे! हे कस शक्य आहे? कारण मुळात थंड पाण्याने आंघोळ करण्याचे फायदेच अनेकांना माहीत नाहीत. त्यामुळे आम्ही तुम्हाला थंड पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे सांगणार आहोत. खालीलप्रमाणे:-

१) जागृकतेत सुधार – एका संशोधनानुसार, थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे अलर्टनेस अर्थात मानवी मेंदूची जागरूकता सुधारते. तसेच थंड पाण्याने आंघोळ केल्याने हार्ट रेट वाढतो आणि श्वास घेण्याची व सोडण्याची गतीही वाढते. थंड पाण्याने चेहरा धुतल्याने व्यक्ती जास्त अलर्ट होतो.

२) मेटाबॉलिज्म वाढते – जर्मनीतील येना मेडिकल कॉलेजच्या संशोधनानुसार, थंड पाण्याने अंघोळ केल्यास शरीराचे मेटाबॉलिज्म वाढते. मुळात शरीरावर थंड पाणी टाकल्याने शरीराचे तापमान कमी होते. अशात शरीराला गरम ठेवण्यासाठी किंवा शरीराचे तापमान योग्य ठेवण्यासाठी मेटाबॉलिज्म जास्त काम करते. याने व्यक्तीला वजन कमी करण्यातही मदत होते.

३) रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते – पीलॉस वन जर्नलनुसार, जे लोक थंड पाण्याने आंघोळ करतात २९ टक्के कमी आजारी पडतात.या संशोधनात ३०१८ लोकांचा समावेश असून त्याना आधी गरम पाण्याने त्यानंतर ३० ते ९० सेकंदापर्यंत थंड पाण्याने आंघोळ करण्यासाठी सांगण्यात आले. यातील एका ग्रुपला केवळ गरम पाण्याने आंघोळ करण्यास सांगितले. या रिसर्चमधून आढळले की, ज्या लोकांनी थंड पाण्याने आंघोळ केली ते कमी दिवस आजारी पडले. तसेच या लोकांची रोगप्रतिकारक शक्तीही वाढली.

४) मूड फ्रेश होतो – थंड पाण्याने आंघोळ केल्याने न्यूरोट्रान्समीटर जसे की, नॉर एपिनेफ्रीन आणि एंडॉर्फिन्स अ‍ॅक्टिव होतात.ज्यामुळे डिप्रेशनची दूर होऊ लागते. परिणामी मूड फ्रेश होतो.

५) शारीरिक थकवा शमतो – जर्नल ऑफ स्ट्रेंथ अ‍ॅन्ड कंडीशनिंग यांच्या रिसर्चनुसार २३ पियर रिव्ह्यूड आर्टिकलमध्ये असे आढळले आहे कि, थंड पाण्याने आंघोळ केल्यास आणि कॉन्ट्रास्ट वॉटर थेरपी घेतल्याने अंगदुखी दूर होते. तसेच शरीराचा थकवासुद्धा दूर होतो.

० महत्वाचे:-
– थंड पाण्याने आंघोळ केल्याचे वेगवेगळे फायदे होत असले तरी थंड पाण्याने आंघोळ करण्याला मेडिकल थेरपी समजू नये. खासकरून अशा लोकांनी हे करू नये जे डॉक्टरांकडून डिप्रेशनवर उपचार घेत आहेत.
– हृदयरोग असलेल्या व्यक्तींनीदेखील थंड पाण्याने आंघोळ करणे टाळावे. कारण यावेळी हृदयाची गति वाढते. अशात हार्ट अटॅक येण्याचा धोका असतो.