|

सूर्यप्रकाशाने अंघोळ कराल तर त्वचेसोबत आरोग्यही सुरक्षित राहील; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। तुम्ही सनबाथ हा शब्द ऐकलाच असेल. आता सनबाथ म्हणजे काय? तर सनबाथ म्हणजे अगदी सोप्प्या भाषेत सांगायचं झालंच तर सूर्यप्रकाशाने अंघोळ करणे. अहो हसताय काय? खरंच. सूर्यप्रकाशाने अंघोळ करता येते. तुम्ही पहिले असाल लहान मुलांना अंघोळ घातल्यानंतर उन्हात घेऊन बसतात. अहो यालाच तर सन बाथ म्हणतात. हिवाळ्यात खाणे-पिणे जेवढे महत्वाचे असते ना तेवढेच ऊनसुद्धा महत्वाचे असते. कारण हिवाळ्यात सूर्यकिरणे केवळ बाहेरील त्वचा नव्हे, तर आतील अवयवांवर देखील परिणाम करतात. आपण थंडीपासून वाचण्यासाठी गरम कपडे घालतो. यामुळे, शरीराला ऊन मिळणे कमी होते. परिणामी अनेक आजारांचा धोका निर्माण होतो. याशिवाय कोणत्याही ऋतूमध्ये सूर्यकिरणे रोग प्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी मदत करतात.यामुळे कोणत्याही आरोग्यविषयक समस्यांपासून वाचण्यासाठी दररोज सकाळी १५ मिनिटे तरी सूर्यप्रकाश अंगावर घेणे अतिशय आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊयात सनबाथचे फायदे खालीलप्रमाणे:-

१) स्किन इन्फेक्शनचा धोका कमी होतो – सूर्याच्या प्रकाशात असे काही गुणधर्म असतात ज्यांच्यामुळे शरीरावर विविध प्रकारच्या इन्फेक्शनची शक्यता कमी होते. तसेच ऊन घेतल्याने शरीरात पांढऱ्या पेशींचे संतुलन राहते. या पेशी रोग निर्माण करणार्‍या कारकांशी लढण्याचे काम करतात.

२) लहान मुलांसाठी फायदेशीर – लहान मुलांसाठी ऊन घेणे अतिशय लाभदायक आहे. कारण या उन्हातून मुलांच्या हाडांना बळकटी मिळेल अशी सत्त्व मिळतात. विशेष करून त्या मुलांसाठी, ज्यांनी आईचे दूध पिणे सोडून दिले आहे, त्यांना ऊन घेतल्याने फायदा होतो.

३) कॅन्सरपासून सुरक्षा – अनेक संशोधनातून समोर आले आहे की, जिथे सूर्यप्रकाश खुप कमी असतो त्यांना कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. शिवाय कॅन्सर रूग्णांना सुद्धा ऊन घेतल्याने बराच फरक पडतो.

४) व्हिटॅमिन डी मिळते – रोज ऊन घेतल्याने शरीराला आवश्यक असणाऱ्या व्हिटॅमिन डी’ची पूर्तता होते. यामुळे हाडे मजबूत होतात आणि सांधेदुखीच्या वेदना दूर होतात.

५) चांगली झोप मिळते – ऊन घेतल्याने आपल्या शरीरात मेलाटोनिन हार्मोन तयार होते. परिणामी आपल्याला चांगली आणि शांत झोप येते. मानसिक तणावदेखील कमी होतो.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *