|

वेळीच व्हा सावधान!!! कॅन्सर ठरतोय जीवघेणा (पूर्वार्ध)

हॅलो आरोग्य ऑनलाईन। कॅन्सर!!! कॅन्सर चे नांव जरी कानावर पडले तरी पोटात भीती चा गोळा येतो, नाही का? असा शरीरातील कोणता अवयव नाही की त्याला कॅन्सर होत नाही. कॅन्सरने एखादा नातेवाईक किंवा मित्रमंडळी पैकी मित्र कॅन्सर मृत्यू पावणे हे आता नेहमीचेच झाले आहे. अर्थात कर्करोग आजही जगासमोरील एक जीवघेणी समस्या आहे. हजारो लोक दरवर्षी कर्करोगामुळे मृत्यू पावतात. पहिल्यांदा असा एक समज निर्माण झाला होता  की जे धुम्रपान करतात त्यांनाच कर्करोग होतो किंवा तंबाखू खाल्ल्यानेच कर्करोग होतो. पण हळूहळू पोटाचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग आणि अन्य कर्करोग जगासमोर उलगडू लागले आणि हे सत्य समोर आले की कर्करोग कोणालाही आणि कसाही होऊ शकतो आणि तेव्हापासून कर्करोगाची जास्त भीती निर्माण झाली. सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे कधी कधी कर्करोग शरीरात असूनही कळत नाही. पण जस जशी वर्षे लोटली तस तसे विज्ञान प्रगत झाले आणि आता कर्करोगापासून वाचवणारे उपचारही आलेत. पण तरी आजही जनमानसात कर्करोगाबद्दल जागरुकता नाही किंवा त्यांना त्याबद्दल काही माहिती नाही. त्याच दृष्टीने आज आपण थोडी जागरूकता निर्माण करणार आहोत. यासाठी आम्ही या विशेष लेखातून तुम्हाला कर्करोग आणि त्याच्या लक्षणांबद्दल विस्तृत माहिती देणार आहोत.

आपलं शरीर हे पेशींनी बनलेलं असतं आणि शरीराचा विकास हा पेशी दुभंगल्यानेच होतो. जोवर आपण 18 वर्षांचे होतो तोवर ह्या पेशी अरबो वेळा दुभंगल्या जातात. पेशींचं हे विभाजन एका रचनेनुसार होतं असतं आणि ते नियंत्रणात असतं. पण अति तेथे माती या म्हणीप्रमाणे जर हे विभाजन नियंत्रणाबाहेर गेले की माणूस कर्करोगाला बळी पडतो. आपण आता कर्करोगाचे काही प्रमुख प्रकार जाणून घेऊ.

  1. स्तनाचा कॅन्सर
  2. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर
  3. तोंडाचा कॅन्सर
  4. प्रोस्टेट कॅन्सर
  5. गर्भाशयाचा कॅन्सर
  6. अंडाशयाचा कॅन्सर
  7. रक्ताचा कॅन्सर
  8. फुफ्फुसांचा कॅन्सर
  9. पोटाचा कॅन्सर
  10. हाडांचा कॅन्सर
  11. गुदाशयाचा कॅन्सर
  12. घश्याचा कॅन्सर
  13. यकृताचा कॅन्सर
  14. त्वचेचा कॅन्सर
  15. मुत्राशयाचा कॅन्सर
  16. मेंदूचा कॅन्सर
  17. मूत्रपिंडाचा कॅन्सर
  18. अंडकोषाचा कॅन्सर
  19. स्वादुपिंडाचा कॅन्सर
  20. गर्भाशयाच्या अंतःस्तराचा कॅन्सर
  21. योनीचा कॅन्सर

 

कॅन्सरची लक्षणे

  1. प्रमाणापेक्षा जास्त वजन वाढणे किंवा कमी होणे
  2. अशक्तपणा आणि थकवा जाणवणे
  3. त्वचेवर वारंवार जखमा होणे
  4. त्वचेखाली एखादी गाठ जाणवणे
  5. श्वासोच्छवासाला त्रास होणे आणि एका महिन्यापेक्षा जास्त काळ खोकला असणे
  6. त्वचेतील बदल, जसे की अस्तित्वात असलेल्या मस किंवा तीळाच्या आकारात बदल होणे किंवा व्रण दिसणे
  7. त्वचेवर सहजपणे खरचटणे
  8. जुलाब किंवा बद्धकोष्ठता यासारख्या पचनाच्या समस्या जाणवणे
  9. गिळायला त्रास होणे
  10. भूक न लागणे
  11. आवाजात बदल जाणवणे
  12. वारंवार ताप किंवा रात्री घाम येणे
  13. स्नायू किंवा सांधे दुखणे आणि जखम भरून निघण्यास उशीर लागणे
  14. वारंवार होणारे इन्फेक्शन

तुम्हाला यापैकी कोणतेही लक्षण दिसल्यास तुमच्या डॉक्टरांशी बोलले पाहिजे कारण लवकरात लवकर कॅन्सरवर उपचार करून त्यावर नियंत्रण मिळवणे चांगले असते. तुम्ही हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की ही सर्व लक्षणे प्रत्येक जणाला दिसतीलच असं नाही आणि प्रत्येकाला याचा अनुभव अगदी सुरुवातीलाच येईल असेही नाही, अनेकवेळा त्याची तीव्रता वाढल्याशिवाय हे लक्षात येत नाहीत. खरंतर, अनेकांना याची कोणतीही लक्षणे अजिबात जाणवत नाहीत, काही विशेष तपासण्या केल्यानंतरच कॅन्सर असल्याचे लक्षात येते. यात महत्वाचा मुद्दा असा की कोणत्याही अगदी क्षुल्लक लक्षणांकडे देखील दुर्लक्ष होता कामा नये. आजच्या पूर्वार्धात एवढेच पाहुयात. उत्तरार्धात कॅन्सर ची कारणे आणि त्याला प्रवृत्त करणारे धोक्याचे घटक याबद्दल माहिती घेऊयात.