| | |

काय सख्यांनो..अनलॉक होताच ब्युटी पार्लरमध्ये जायचंय..? मग या गोष्टींची काळजी घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण सारेच जाणतो कि संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने कसे थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाऊन जारी केला होता. या दरम्यान स्त्रियांचे ब्युटी पार्लर पूर्णतः बंद झाल्याने त्यांची विशेष कोंडी झाली होती. त्यानंतर आता हळूहळू अनेक जिल्हे अनलॉक होऊ लागले आहेत. त्यामुळे महिलांची पहिली धाव निश्चितच ब्युटी पार्लरकडे असणार यात काही वादच नाही. मात्र कोरोना संपलेला नाही हे लक्षात ठेवून दक्षता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना योग्य ती सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. यामुळे ब्यूटीपार्लरमध्ये जाताना आणि गेल्यावर स्वतःची काळजी कशी घ्यावी याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अत्यंत महत्वाचे – ब्युटी पार्लरला जाताना घरातून निघण्यापूर्वी आपल्याकडे सॅनिटायझर आहे का नाही याचसोबत तोंडावर योग्य पद्धतीने मास्क लावला असल्याची खात्री करून घ्या. शिवाय आपल्याकडे एखादा जादा मास्क बॅगेत ठेवा.

– ब्युटी पार्लर मध्ये जास्त वर्दळ नसल्यासच

– ब्युटी पार्लरमध्ये आपल्या व्यतिरिक्त असणाऱ्या लोकांपासून योग्य तितके अंतर राखावे.

– ब्युटी पार्लरमध्ये गेल्यानंतर आपल्या तोंडावरून मास्क काढू नका.

– ब्युटी पार्लरमधील कोणत्याही अन्य वस्तूंना हात लावू नका आणि जर स्पर्श केलात तर न विसरता त्वरित हाताला सॅनेटाईझ करा किंवा हॅन्ड ग्लव्जचा वापर करावा.

– हेअर स्पा किंवा सलूनमध्ये जाताना या गोष्टींची खात्री करा की पार्लरच्या कामगाराने फेस शील्ड लावला असेल. शिवाय वापरात येणारी साधने ( कैची, ब्रश किंवा मशिन्स) एका व्यक्तीसाठी वापरल्यानंतर सॅनिटाईज केलेले असेल.

– पार्लरमध्ये किंवा सलूनमध्ये ग्राहकास हाताळणारे कामगार कोरोनाच्या नियमांचे पालन करीत असल्याची खात्री करून घ्या. जसे कि तोंडावर योग्य पद्धतीने मास्क लावणे, फेस शिल्ड वापरणे, हॅन्ड ग्लव्ज वापरणे, सॅनिटायझरचा वापर, एकावेळी एकाच ग्राहकास हाताळणे.

– केस कापतेवेळी पार्लरच्या कामगाराकडून वापरले जाणारे कापड प्रत्येक ग्राहकांसाठी वेगळे असल्याची खात्री करून घ्या.

– ग्राहकांइतकीच काळजी पार्लरच्या कामगारांनी देखील घेणे गरजेचे आहे. काम करतेवेळी ग्राहक हाताळताना कापड्याच्या जागी डिस्पोझेबल कापड किंवा कॉटन टिश्यूचा वापर करावा.