pimples
| | | |

OMG पिंपल्सने लावली सुंदर चेहऱ्याची वाट; करा ‘हे’ उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपला चेहरा आपली ओळख असते. म्हणजे सर्वसाधारणपणे कुणी कुणाबद्दल सांगत असेल तर चेहऱ्याचे वर्णन करून सांगितले जाते. स्त्रिया तर आपल्या चेहऱ्याला एखादं लहान मूल सांभाळावं इतक्या प्रेमाने सांभाळतात. कारण सुंदर दिसणे हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि तो आपल्यालाच मिळवावा लागतो. पण धूळ, प्रदूषण, माती, अनियमित आहार, झोपेचा अभाव, हार्मोनल इम्बॅलन्स, मासिक पाळी आणि इतर अनेक कारणांमुळे चेहरा खराब होतो. यात ऍक्ने, पुरळ, पिंपल्स आणि इतर बऱ्याच समस्यांमुळे चेहरा निस्तेज होऊ लागतो. ज्यामुळे चेहऱ्याची काळजी घेण्याकडे अनेकांचा कल दिसून येतो.

चेहऱ्यावर पिंपल्स येणे हि समस्या केवळ मुलींना नव्हे तर मुलांनाही सतावते. आजकाल स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्येच या समस्येत वाढ होताना दिसतेय. पिंपल्स हि अशी समस्या आहे ज्यामुळे चेहऱ्यावर डाग तयार होतात. हे डाग इतके कठीण असतात कि जात नाहीत. परिणामी चेहऱ्याचे सौंदर्य धोक्यात येते. यासाठी मग महागड्या ट्रीटमेंट आणि सौंदर्य प्रसाधनांचा वापर केला जातो. यामुळे अनेकदा चेहरा तात्पुरता सुंदर दिसला तरीही कालांतराने जैसे थे अशी परिस्थिती निर्माण होते. म्हणूनच चेहऱ्याची काळजी घ्या पण घरगुती वा आयुर्वेदिक पद्धतीने. आज आपण जाणून घेऊ कि असे कोणते उपाय आहेत जे खर्चिक नाहीत पण प्रभावी आहेत.

० चेहऱ्यावर पिंपल्स आल्यास कोणते उपाय करालं..?

आपला चेहरा सुंदर असावा यासाठी फार सोप्पे उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जे घरगुती आहेत. फार वेळ आणि पैसा यात वाया जात नाही. शिवाय हे अत्यंत प्रभावी आहेत. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

1. दिवसातून २ ते ३ वेळा चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे अतिरिक्त तेल आणि घाण निघून जाते आणि पिंपल्स होण्याचा धोका टळतो.

2. ग्रीन टी चे सेवन करा. यातील अँटिऑक्सिडंट गुण त्वचेला तजेलदार ठेवतात.

3. रोज कोरफडीच्या गराचा चेहऱ्यावर मास्क लावा आणि नियमित त्वचा मॉइश्चराइज करा.

4. नियमित रात्री कच्च्या दुधात कॉटनचा बोळा बुडवून पिंपल्सवर लावा.

5. चेहऱ्यावर पिंपल्स आल्यास हळद आणि गुलाबजलचे मिश्रण चेहऱ्यावर लावून चेहरा स्वच्छ करा. यामुळे त्वचेत साचलेली माती वा मळ निघून जातो.

० पिंपल्सवर आयुर्वेदिक उपचार

1. आहार सकस आणि पौष्टिक असावा. यासाठी हिरव्या भाज्या, पोळी, वरण-भात, दूध, तूप असा सात्त्विक आहार घ्या.

2. नेहमी आनंदी व शांत राहण्याचा प्रयत्न करा. ताण तणावापासून दूर रहा.

3. बाजारात मिळणा-या सौंदर्यप्रसाधनाचा वापर करू नये.

4. दर तासाला चेहरा पाण्याने स्वच्छ करा. यामुळे चेह-याच्या त्वचेला ओलसरपणा मिळतो.

5. पिंपल्स वाढत असल्यास वेळीच औषधोपचार घेतल्यास चेहरा सतेज होऊ शकतो.