Beauty tips especially for women on the occasion of International Women's Day

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खास  महिलांसाठी टिप्स

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  प्रत्येक स्त्री हि आयुष्यातील अनेक वेगवेगळे टप्पे पार करत आपले जीवन जगत असते. कधी सुखाचे तर कधी दुःखाचे असे सगळे आयुष्य जगत आपले अस्तित्व निर्माण करत असते. कधी ती महिला एक आई बनून आपले कर्तव्य पार करत असते . तर कधी मैत्रीण , बहीण,  प्रेयसी,  पत्नी अशा सगळ्या प्रकारच्या माध्यमातून महिलां इतरांसाठी आपले आयुष्य हे जगत असते . महिलां वेगवेगळ्या पद्धतीचे रोल करून आपल्या सगळ्या समस्यांना पाठीशी घालून ती आपली कामे कमी  पार पाडत  असते. हे सारे कौशल्य फक्त आणि फक्त एका महिलेकडेच असू शकते. त्यामळे महिलां दिनाच्या निमित्ताने फक्त महिलांसाठी काही ब्युटी टिप्स पाहूया …

प्रथम सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा . सगळ्या महिलां आपले अस्तित्व निर्माण करण्याच्या आटोकाट प्रयन्त करत असताना , स्वतःसाठी मात्र त्यांच्याकडे वेळच नसतो. पण या महिला दिनी स्वतःलाच काही वचन देण्याची वेळ आली आहे स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःचे लाड पुरवा आणि नेहमीच स्वतःवर प्रेम करा. कारण आपल्या स्वतःच्या व्यतिरिक्त आयुष्यात अशी कोणतीच गोष्ट मोठी नाही. स्वतःवर प्रेम करा. नेहमीच स्वतःसाठी काही तरी करण्याचा प्रयत्न करताना एक पर्टिक्युलर दिवस असणेच खूप महत्वाचे नाही . त्यामुळे नेहमी स्वतःसाठी वेळ द्या .

स्वतःसाठी करताना नेहमी या गोष्टी लक्षात ठेवा —

नेहमी स्वतःची काळजी घ्या . स्वतःच्या हौस मौस करण्याचा प्रयत्न करा, कि ज्या प्रत्येक वेळ आपल्या कुटुंबासमोर आपल्या हौसेला नेहमी शेवटचा पर्याय दिला जातो. नेहमी स्वतःची हौस करा. काही वेळ देता येणार नाही , पण ठराविक वेळेनंतर स्वतःला वेळ द्याच . आयुष्य एकदाच आहे , ते मनमुराद जगण्याचा प्रयत्न करा. आपल्या स्वतःसाठी आणलेला एखादा पोशाख घालायला वेळच नाही मिळाला , म्हणून तुम्ही दुखी वाटून घेऊ नका . तो पोशाख घालून मिरवा. म्हणजे आनंद वाटेल.

शरीरावरील नको असलेले केस काढताना कोणत्याही प्रकारचा त्रास, वेदना न होता मिळणारा मऊमुलायम स्पर्श तुम्हाला  हवा असेल तर पुन्हा पुन्हा वीनस वापरण्यास वापरा. केस कमी करताना कधीतरी आपण योग्य दिसू का ? आपल्याला हा कट भारी राहील का ? असे प्रश्न असतील तर त्याला फाट्यावर मारा. आणि आपल्याला हवे तेच करा. ‘गो-टू’ ब्युटी म्हणजेच तात्काळ सौंदर्य मिळवण्याचे हे माझे एक साधन बनले आहे. माझ्या आधुनिक जीवनपद्धतीमध्ये हे अगदी सुयोग्य ठरते.

चांगली झोप मानसिक स्वास्थाकरिता आवश्यक असते, आपली जीवनशैली इतकी धावपळीची झाली आहे की, आपले पुरेशा झोपेकडे अगदी दुर्लक्ष झाले आहे. इतरांना नेहमी वेळ देतो तर अश्या वेळी आपल्यासाठी सुद्धा तितकाच वेळ द्या. तुमच्या त्वचेसाठी तुम्ही एक उत्तम उपाय करू शकता तो म्हणजे गाढ झोप. झोपेत आपले शरीर दुरुस्त होत असते, अगदी तुमची त्वचा देखील. खोल श्वास व मेडिटेशन हे देखील त्वचेच्या स्वच्छतेकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत, कारण श्वास आत घेणे व बाहेर सोडणे या क्रियेतून तुम्हाला तुमच्या त्वचेबाबत जागरुक होण्यास मदत होते आणि त्यामुळे ती ताजीतवानी होते. सकाळी आपल्या कामातून वेळ काढत काही वेळ व्यायामाला द्या . आपले शरीर बळकट बनवा.