Beneficial benefits of sprouted wheat for hair?

अंकुरलेल्या गव्हाचे   केसांसाठी  असलेले लाभकारक  फायदे ? 

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  प्रत्येक स्त्री हि आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या केसांसाठी खूप काळजी घेत असते. केस जर लांब आणि जाड असतील तर तुमच्या दिसण्यात आणि सौदर्यात खूप फरक पडलेला जाणवतो. केस जर सडपातळ असतील तर अशा वेळी घरगुती उपायांचा वापर करू शकतो.  कोणत्याही प्रकारच्या  रासायनिक प्रॉडक्ट चा  वापर  करण्यापेक्षा  घरगुती उपायांचा   वापर केल्याने कोणत्याही चुकीच्या प्रक्रिया  केसांसाठी  होत नाहीत. त्यामुळे केस नेहमी लांबच राहतील. त्यावेळी मात्र अंकुरलेल्या गहू याचा वापर केला तर त्याचे फायदे काय होतात, ते जाणून घेऊया ……..

गहू आणि त्याच्या अंकुरामध्ये प्रोटिन्स , क्षार आणि वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्वे असतात . ते आपल्या केसांना पोषक वातावरण तयार  होऊ शकते. त्यासाठी  अर्धी वाटी गहू हे पाण्यात भिजत ठेवा . त्यानंतर पीठ काढायच्या चाळणीमध्ये काही प्रमाणात ते सारे भिजलेले एकत्र करून पाण्यातून बाहेर काढा . आणि सकाळी सकाळी ते सूर्यप्रकाशाच्या खाली ठेवा. त्यानंतर दहा ते बारा दिवसानंतर त्याला कोंब यायला सुरुवात होते. अशा वेळी त्याची थोडी वाढ झाली कि , ते बाहेर काढून हिरव्या पातीचा वापर  करून रस  काढा .  हा रस काढून तो  दररोज आहारात घ्या . दर दोन ते तीन दिवसानंतर त्याचा वापर हा करायचा आहे . अश्या पद्धतीने गहू भिजत घालत चला .

नियमित पणे कमीतकमी एक महिना याचा प्रयोग केला असता , तुम्हाला तुमच्या केसांमध्ये खूप फरक जाणवलेला आढळेल. त्यावेळी मात्र तुमचे केस तुटणे , केस गळणे . केस पांढरे होणे अशा समस्या या कमी कमी होत जातील. त्यामुळे केसांना सुद्धा चकाकी आणि मुलायम पणा हा जाणवू लागेल . ज्या केसांना वाढ नाही त्या केसांची सुद्धा वाढ होण्यास मदत होऊ शकते .