Benefits of Banana
|

Benefits of Banana : तुम्हीसुद्धा जास्त पिकलेली केळं फेकून देता? अशी केळे घाण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन (Benefits of Banana) । केळी हे प्रत्येकाच्याच आवडीचे फळ आहे. उन्हाळा असो वा हिवाळा केळी नेहमीच आपल्या आहारात असते. कमी वेळेत भूक भागवण्याचे काम केळी करतात. मात्र अनेकदा आपण बाजारातून (Market) केळी आणतो अन ती लवकर न खाल्याने काळी पडतात. तुम्हीसुद्धा अशी साल काळी झालेली केळे फेकून देत असाल तर थांबा. आज आम्ही तुम्हाला जास्त पिकलेल्या केळी खाण्याचे जबरदस्त फायदे सांगणार आहोत.

केळी पोषक तत्वांनी परिपूर्ण असते. त्यात जीवनसत्त्वे, फायबर, कॅल्शियम, लोह आणि पोटॅशियम यांसारखे पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळतात. रोज केळीचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बहुतेक लोक हिरवी म्हणजे कच्च्या केळीची भाजी शिजवून खातात. तर, पिवळ्या रंगाची केळी थेट खातात किंवा स्मूदी बनवण्यासाठी वापरली जातात. केळी जास्त पिकल्यावर त्याच्या सालीचा रंग काळा किंवा तपकिरी होतो. अशा परिस्थितीत अनेकजण ते सडलेले समजून फेकतात. पण जास्त पिकलेली केळी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात हे तुम्हाला माहिती आहे का? Benefits of Banana

जास्त पिकलेल्या केळ्यांमध्ये जास्त प्रमाणात ट्रिप्टोफॅन असते. यामुळे तणाव आणि चिंता कमी होते. याशिवाय यामध्ये अँटीऑक्सिडंट्सही मुबलक प्रमाणात असतात. याचे सेवन केल्याने अनेक आजारांपासून मुक्ती मिळते. आज या लेखात आपण पोषणशालाशी संबंधित आहारतज्ञ रक्षिता मेहरा यांच्याकडून जास्त पिकलेली केळी खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.

जास्त पिकलेली केळी खाण्याचे फायदे (Benefits of Banana) –

  1. पेशींना नुकसान होण्यापासून प्रतिबंधित करते.
  2. जास्त पिकलेल्या केळ्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि अनेक प्रकारचे आजार टाळले जातात. तसेच, ते पेशींना नुकसान होण्यापासून प्रतिबंधित करते.
  3. जास्त पिकलेली केळी हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात आढळते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
  4. जास्त पिकलेली केळी खाल्ल्यानेही कोलेस्ट्रॉल कमी होते. हृदयविकाराचा धोका कमी करण्यासही हे उपयुक्त आहे.
  5. जास्त पिकलेली केळी पचायला सोपी असतात. यामध्ये असलेल्या स्टार्चचे फ्री शुगरमध्ये रूपांतर होते, त्यामुळे ते लवकर पचते. हे खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जाही मिळते. कमकुवत पचनसंस्था असणा-यांनी जास्त पिकलेली केळी खावी. Benefits of Banana
  6. जास्त पिकलेली केळी खाल्ल्याने छातीत जळजळ होण्याच्या समस्येवर मात करता येते. खरं तर, ते अँटासिड म्हणून काम करते. यामध्ये असलेले गुणधर्म पोटाच्या आतील अस्तरांना हानिकारक ऍसिडपासून वाचवतात. हे खाल्ल्याने अॅसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळतो.
  7. जास्त पिकलेल्या केळीच्या सालीमध्ये एक विशेष प्रकारचा पदार्थ तयार होतो, त्याला ट्यूमर नेक्रोसिस फॅक्टर म्हणतात. हे कर्करोग आणि इतर असामान्य पेशींचा प्रसार रोखून कार्य करते.
  8. जर तुम्हाला स्नायूंच्या दुखण्याने त्रास होत असेल तर तुम्ही जास्त पिकलेल्या केळ्यांचे सेवन करावे. यामध्ये पोटॅशियम भरपूर असते, जे स्नायू दुखणे आणि पेटके दूर करण्यास मदत करते.