Massage Spa
|

हिवाळ्यात मालिश करण्याचे ‘हे’ आहेत फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या शरीराला मालिश केले तर त्याचे अनेक वेगवेगळे फायदे आहेत. हिवाळ्याच्या दिवसांत मालिश केल्याने आपले आरोग्य हे व्यवस्थित राहण्यास मदत होते. हिवाळ्याच्या दिवसांत सगळीकडे वातावरण हे फार थंडीचे असते. त्या दिवसांत आपल्या शरीराबरोबर आपल्या त्वचेची काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे. या दिवसांमध्ये त्वचा हि फार कोरडी पडण्यास सुरुवात होते. रुक्ष त्वचा झाली तर मात्र आपल्या शरीराला वेदना होण्यास सुरुवात होते. Benefits of Body Massage During Winter

हिवाळ्याच्या दिवसांत आपली त्वचा हि कोरडी पडते आणि सुस्तपणा वाढतो. थंडीच्या दरम्यान त्वचे आणि शरीरास पुरेशी पोषणाची गरज भासते. हिवाळाच्या हंगामात सांधे आणि स्नायूमध्ये वेदना आणि दुखापत झालेली असणाऱ्या लोकांचे त्रास वाढतात. त्यामुळे अश्या वेळी मालिश करणे हाच एकमेव उपाय असतो.

रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत करते —

शरीरात रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी आपल्या शरीराला काही प्रमाणात मालिश करणे आवश्यक आहे. स्नायूंमध्ये असलेला कठीणपणा दूर करण्यासाठी मालिश आवश्यक आहे. एका केलेल्या अभ्यासानुसार आपल्या नोड च्या भोवती जर आपण मालिश केले तर , आपल्या शरीरातील रक्तपेशींचा वेग वाढण्यास मदत होऊ शकते. आपल्या शरीरात असलेली रक्ताभिसरण क्रिया हि सुरळीत होण्यासाठी आपल्या शरीराला मालिश करणे आवश्यक आहे. इतर आजरांशी लढण्यास सुद्धा मदत होऊ शकते.

विश्रांतीसाठी मालिश करा —

आपल्या मेंदूला अनेक प्रकारची वेगवेगळी कामे असतात. आपल्या मेंदूला थोड्या फार प्रमाणात विश्रांती मिळण्यासाठी मेंदूला काही प्रमाणात मालिश करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित रित्या झोप लागू शकते. मेंदू हा आपल्या सगळ्या अवयवांना चालना देण्याचे काम करत असतो. Benefits of Body Massage During Winter

वेदना दूर होण्यास मदत होते —

हिवाळ्याच्या दिवसांत आपल्याला अनेक प्रकारच्या वेदना या जाणवतात. वेदना कमी करण्यासाठी शरीराच्या काही भागांना मालिश करणे आवश्यक आहेच. जे लोक वयस्कर असतात . त्यांना हिवाळ्याच्या दिवसांत सांधेदुखी, स्नायुदुखी , कंबर दुखी अश्या समस्यांना सामोरे जावे लागते त्या वेळी अश्या समस्यांपासून जर दूर राहायचे असेल तर मात्र आपण आठवड्यातून दोनदा योग्य तेलाचा वापर करून मालिश करणे आवश्यक आहे.

रक्त भिसरण क्रिया हि जास्त वाढते —-

हिवाळ्याच्या दिवसांत आपल्या शरीराला सुस्त बनवते. आणि आळस हा निर्माण होतो अश्या वेळी आपल्या शरीराला मालिश केले तर शरीरातील रक्ताभिसरण क्रिया हि व्यवस्थित सुरळीत होण्यास मदत होते. एकतर थंडीच्या दिवसांत सकाळी उठणे हे फार जिकरीचे होते त्यामुळे सकाळी उठून व्यायाम करणे , सकाळी उठून चालायला जाणे अवघड होत जाते . अश्या वेळी आपल्या शरीराला मालिश करणे हाच एक पर्याय असू शकतो.