Stale Chapati
| |

शिळी चपाती खाण्याचे ‘हे’ आहेत आश्चर्यकारक फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आरोग्यदृष्ट्या शिळे अन्न खाणे हे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे असं वैद्यकशास्त्र सांगते. पण प्रत्येक वेळी ताजे अन्न आपल्याला मिळेलच असेही नाही. कधी कधी काही कारणास्तव आपल्याला शिळे अन्नही खावे लागते. जेवण तयार केल्यानंतर किमान चार तासानंतर ते शिळे होण्याची क्रिया चालू होते. आणि आठ तासांत अन्नाचे रूपांतर विषात होण्यास सुरवात होते. असे अन्न जर आपल्या सेवनात आल्यास आपणांस उलट्या, अतिसार, फूड पॉइजनिंग, ऍसिडिटी, तीव्र डोकेदुखी, अंग थरथरणे आदि स्वरूपाची लक्षणे दिसू लागतात. अशा वेळी वेळेत तज्ञ् डॉक्टरांची ट्रीटमेंट घेणे अतिशय आवश्यक होऊन बसते. मात्र सगळेच शिळे पदार्थ हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक नसतात तर काही फायदेशीर देखील असतात. शिळी चपाती खाण्याचे आश्चर्यकारक फायदे आज आपण जाणुन घेणार आहोत. (Benefits of Eating Stale Chapati)

शरीराला फायदा होणाऱ्या पदार्थामध्ये शिळ्या चपातीचा समवेत होतो. १२ ते १४ तास शिळ्या असणाऱ्या चपाती मध्ये असे लाभकारक जिवाणू वाढीस लागतात जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. तर चला जाणुन घेऊयात कोण-कोणते फायदे आहेत ते.

ऍसिडिटी पासून आराम

ज्यांना गॅस, पचनाच्या समस्या आहेत किंवा ऍसिडिटीचा त्रास होतो त्यांनी आहारात शिळ्या चपातीचा नक्कीच समावेश करावा. गव्हाच्या चपातीमध्ये असणारे फायबर आपली पचनशक्ती मजबूत करते आणि वर उल्लेख केलेल्या समस्या आश्चर्यकारकरित्या कमी होतात.

ब्लडप्रेशर वर नियंत्रण

थंड दुधात शिळी चपाती १० ते १५ मिनिटे भिजवून ठेवा आणि नंतर त्याचे न्याहरीला सेवन केल्यास तर तुमचा ब्लडप्रेशर नियंत्रणात येतो.

व्यायाम करणाऱ्यांसाठी वरदान

आपण नियमीत व्यायाम, जिम करत असाल तर आपल्याला दुधाबरोबर चपाती खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण ताज्या चपाती पेक्षा शिळी चपाती व्यायाम करताना शरीराची झालेली झीज लवकर भरून काढते व अशक्तपणा न येता आपणांस तंदरुस्त ठेवते. (Benefits of Eating Stale Chapati)

शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत

सामान्यपणे मानवी शरीराचे तापमान ३७ डिग्री सेल्सियस असते ते जर ४० डिग्री सेल्सियस च्या पुढे गेल्यास उष्माघाताचा त्रास सुरु होऊ शकतो. जर आपण शिळी चपाती जर दूध किंवा पाण्यात भिजवून सकाळच्या जेवणात घेतली तर दिवसभर शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते

साखर व वजनावर नियंत्रण

सध्या बाजारात मिळणाऱ्या महागड्या ओट्स पेक्षा शिळ्या चपातीने आपल्या रक्तातील साखरेचा स्तर नियंत्रित ठेवला जातो. तसेच आपले वजन सुद्धा नियंत्रित राहते (Benefits of Eating Stale Chapati)