Benefits Of Lemon Water: कोमट पाण्यातून लिंबाचे सेवन करा आणि अमृतासमान फायदे मिळवा; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। Benefits Of Lemon Water कडक उन्हाळ्यात कोरड्या घशाला आणि अस्वस्थ मनाला शांती देणारं लिंबू पाणी एखादे अमृत आहे असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही. कारण लिंबू पाणी प्यायल्याने केवळ तहान भागत नाही तर शरीरातील विविध क्रियांनाही चालना मिळते. यामुळे लिंबू पाणी पिणे केवळ उन्हाळ्यापुरता मर्यादित ठेवू नका. तर वर्षाच्या बाराही महिने लिंबू पाणी पिणे फायदेशीर आहे.
याचे कारण म्हणजे शरीरातील पाणी कमी झाल्यास बॉडी डिहायड्रेट होते. परिणामी शारीरिक क्रियांमध्ये अडचण येते. अशावेळी लिंबू पाणी प्यायल्याने शरीरातील डिहायड्रेशनची समस्या दूर होते. शिवाय रोग प्रतिकार शक्ती देखील वाढते. पण अधिक फायद्यांसाठी कोमट पाण्यातून लिंबाच्या रसाचे सेवन करावे असा सल्ला तज्ञ देतात. (Benefits Of Lemon Water)
तसेच आम्लपित्त, मळमळ वा अपचन यासारख्या समस्या उद्भवलयासदेखील कोमट लिंबू पाणी पिणे फायदेशीर आहे. तसेच तोंडाची चव वाढवण्यासाठीदेखील लिंबू पाणी फायदेशीर आहे. तसा आहारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लिंबूचा समावेश केला जातो. आकाराने छोट्या असलेल्या लिंबात अनेक औषधी गुणधर्मांचा साठा आहे. शिवाय लिंबूचे सेवन केल्याने आपल्याला आरोग्यदायी लाभ मिळतात.
तसेच नैसर्गिक स्वरुपात शरीर डिटॉक्स करण्यासाठी लिंबू पाणी एक नंबर उपाय आहे. त्यामुळे तज्ञही आवश्यकतेनुसार लिंबू पाणी पिण्याचा सल्ला देतात. बहुतांश जणांना वेगवेगळ्या स्वरुपात लिंबू खाणं पसंत असते. अगदी लिंबाचे सरबत, लोणचे, मोजितो असे विविध प्रकार करून लिंबाचे सेवन केले जाऊ शकते.
कोमट लिंबू पाण्याचे आरोग्यदायी फायदे
(Benefits Of Lemon Water)
१) शारीरिक ऊर्जेत वाढ – लिंबात जीवनसत्वे आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे लिंबू पाणी प्यायल्याने शरीरातील उर्जेचे प्रमाण वाढते. साइट्रस असणारे फळे शरीरातील उर्जा वाढवण्यास उपयुक्त ठरतात. त्यामुळे शारीरिक व मानसिक थकवा जाणवत नाही.
२) रोग प्रतिकारक शक्तीत सुधार – (Benefits Of Lemon Water) रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून प्या. यामुळे शरीराला व्हिटॅमिन C मिळेल. परिणामी रोग प्रतिकारक शक्तीत सुधार होईल. मुळातच लिंबू हा व्हिटॅमिन सी’चा खूप चांगला स्रोत आहे आणि त्यामुळे कोमट पाण्यात लिंबू मिसळून प्यायल्याने शरीरातील पी.एच स्तर नियंत्रित राहतो. यामुळे शरीराची रोग प्रतिकारक शक्ती सुधारते.
३) उत्तम रक्ताभिसरण – शरीरातील रक्त वाहिन्या सुव्यस्थित असल्यास शारीरिक क्रिया आणि अवयव व्यवस्थित राहतात. यासाठी कोमट पाण्यात लिंबू पिळून प्या. यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित राहते. तसेच कोमट पाणी पिण्यामुळे शरीरातील तापमान वाढते. याशिवाय शरीरातील तापमान वाढल्यामुळे घाम सुटतो आणि घामावाटे आपल्या शरीरातील विषारी द्रव्य बाहेर निघून जातात. (Benefits Of Lemon Water)
४) सर्दी खोकल्यावर प्रभावी – अनेकदा वातावरणातील बदल सर्दी खोकला यासारखे आजार घेऊन येतात. अशी अचानक होणारी सर्दी छातीत कफ तयार करते. दरम्यान घसादेखील बसतो. अशावेळी गरम पाण्यात थोडासा लिंबू पिळून प्या. असे केल्यास शरीरासाठी खूप फायदा होतो. तसेच गरम पाणी प्यायल्याने कफ कमी होण्यास मदत होते आणि घशाला अराम मिळतो.
५) सहज सोपी पचनक्रिया – लिंबात अशी बरीच तत्वे उपलब्ध असतात ज्यामुळे पचनसंस्थेमधील टॉक्सिन्स (विषारी तत्व) नाहीसे होतात. यासाठी रोज सकाळी कोमट पाण्यातून लिंबाचे सेवन करा. लिंबू पाण्यामुळे पोटाच्या तक्रारींपासून आराम मिळतो. अॅसिडिटी-गॅसेसच्या त्रासापासून आराम मिळतो.
(Benefits Of Lemon Water) याने पोटात होणा-या जंतुसंसर्गापासून रक्षण होण्यास मदत होते. लिंबात व्हिटॅमिन सी आणि एसकॉरबिक अॅसिड असते. याने पोट साफ राहण्यास मदत होते. यामध्ये अॅन्टी-इन्फ्लेमेटरी तत्व असल्याने पोटात असणा-या बॅक्टेरियापासून रक्षण होते तसेच सर्दी-खोकला होत नाही.
६) किडनी स्टोनपासून सुटका – लिंबात अनेक तत्व उपलब्ध असतात. ज्यामुळे शरीरातील खास करुन पोटातील विषारी तत्व नाहिसे होतात. लिंबू पाणी पिण्याने शरीरातील रक्त साफ होते. यूरिनशी निगडित समस्येपासून आराम मिळण्यासाठी कोमट लिंबू पाणी पिणे फायद्याचे ठरते. कारण लिंबामुळे पित्त आणि किडनी स्टोनपासून आराम मिळतो.
७) वेट कंट्रोलर – (Benefits Of Lemon Water) शरीरातील चरबी कमी करण्यासाठी कोमट पाणी पिण्याचा फायदा होतो. यासाठी कोमट पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्या. यामुळे मेटाबॉलिजम वाढण्यास मदत होते आणि वजन कमी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे जर तुमचं वजन खूप वाढतंय असं तुम्हाला जाणवत असेल तर रोज सकाळी उठून कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून प्या. कमीत कमी २ ते ३ महिने हा उपाय करुन पहा. यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल. यामध्ये लिंबू आणि कोमट पाण्याचे संयोजन शरीरातील व पोटाची चरबी झपाट्याने अगदी मेणासारखी वितळवते.
८) त्वचेसाठी फायदेशीर – लिंबात भरपुर व्हिटॅमिन असतात. यात बरेच अॅन्टी- ऑक्सीडेंट्स असल्याने त्वचा नितळ आणि तितकीच तजेलदार राहते. यामुळे चेह-यावरील डाग, सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. म्हणून गरम पाण्यात लिंबू टाकून प्या. याचा फायदा त्वचा चमकदार व मुलायम होण्यासाठी होतो. लिंबू पाणी पिण्यामुळे आपल्या चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या आणि पिंपल्स येत नाही. (Benefits Of Lemon Water)
‘हे’ पण वाचा :-
लिंबू पाण्यात गूळ टाकून प्याल तर इम्यूनिटी राहील सुरक्षित; जाणून घ्या
लिंबू कापताना आडवाच का कापायचा?; जाणून घ्या कारण
स्लिम ट्रिम व्हायचंय..? मग ग्रीन टी सोबत घ्या लिंबू आणि पुदिना; अधिक जाणून घ्या