| | | |

लिंबू पाण्यात गूळ टाकून प्याल तर इम्यूनिटी राहील सुरक्षित; जाणून घ्या 

हॅलो आरोग्य ऑनलाईन| आपल्याला निरोगी राहायचं असेल तर आपली जीवनपद्धती सुयोग्य आणि खाण्यापिण्याच्या पद्धती सुधारित हव्या. मात्र आपण आरोग्यापेक्षा चवीकडे जास्त लक्ष देतो आणि जिभेचे लाड आपल्याला फिट आणि हेल्दी राहण्यापासून वंचित ठेवतात. यामुळे वाढते वजन, हृदयाच्या समस्या, खराब लिव्हर असे विविध गंभीर आजार शरीराला लागतात. म्हणूनच शरीराला हायड्रेट करण्यावर लक्ष दिले पाहिजे.

 

शरीराला हायड्रेट करण्यासाठी फार काही करण्याची गरज नाही. फक्त रोजच्या आहारात लिंबू आणि गूळ हे दोन पदार्थ असतील याची काळजी घ्या. कारण हे दोन्ही पदार्थ मेटाबॉलिज्म सुधरतात आणि यासोबत पोटाची चरबी कमी करण्यासाठी मदत करतात. परिणामी वजनही नियंत्रणात राहते. मुख्य म्हणजे वजन घटवण्यासाठी गूळ आणि लिंबू पाणी ही फार जुन्या काळापासून वापरात असलेली एक आयुर्वेदिक पद्धत आहे. चला तर जाणून घेऊया लिंबू पाण्यासोबत गुळाचे सेवन कसे करायचे आणि त्याचे फायदे काय ते खालीलप्रमाणे:-

 

० लिंबूपाणी आणि गुळाचे सेवन कसे कराल?

– यासाठी एका ग्लासात कोमट पाणी घ्या आणि त्यात लिंबाचा रस व अगदी छोटासा गुळाचा तुकडा टाका. पाण्यात गूळ पूर्ण विरघळल्यानंतर हे मिश्रण प्या.

– वाढते किंवा वाढलेले वजन घटवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर दररोज रिकाम्या पोटी १ ग्लास गूळ आणि लिंबू पाण्याचे सेवन करा. हे फायदेशीर असते.

 

० गुळाचे फायदे –

१) साखरेच्या तुलनेत गुळामध्ये कमी प्रमाणात कॅलरीज असतात.

 

२) गुळातील अँटी ऑक्सिडंट्स, झिंक आणि सेलेनियम शरीराची इम्युनिटी वाढण्यास मदत करते.

 

३) गूळ शरीरात साचलेले अनावश्यक व विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतो.

४) जेवणानंतर गुळाचा छोटा खडा खाल्ल्यास जेवण सहज आणि व्यवस्थित पचते.

५) गूळ श्वसन आणि पाचनतंत्राच्या सफाईसाठी चांगला पर्याय आहे.

 

० लिंबाचे फायदे –

१) लिंबामध्ये व्हिटामिन सी भरपूर प्रमाणात असते. जे आरोग्यासाठी गरजेचे आहे.

२) लिंबाच्या रसाने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.

३) लिंबाचा रस इम्यूनिटीसह मेटाबॉलिज्मही वाढविण्यास सहाय्यक आहे.

४) लिंबाच्या रसातील पॉलिफिनोल अँटी ऑक्सिडंट वजन नियंत्रित ठेवतात.

५) लिंबाच्या रसातील पॉलिफिनॉल एलडीएल कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करतो आणि एचडीएल कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढवतो.