Benefits of Nirgudi leaves
|

निर्गुडीच्या  पानांचे असलेले फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या आजूबाजूला निर्गुडीची झाडे असतील . या झाडांची पाने हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फार लाभकारक आहेत . निर्गुडीच्या पानाचा वापर हा आपल्या शरीराच्या दुखऱ्या भागासाठी केला जातो. पूर्वीच्या काळी ओल्या निर्गुडीच्या पानाचा वापर हा जखमेवर करत असत. तसेच ज्यावेळी हात किंवा पाय यांच्या  काही समस्या निर्माण होत असतील त्यावेळी निर्गुडीच्या पानांचा वापर हा केला जातो. हाडे दुखत असतील तर त्यावेळी निर्गुडी वापरली जाते.

वाताच्या समस्यांवर निर्गुडीच्या पानांचा वापर हा केला जातो . एका मडक्यात खूप सारी निर्गुडीची पाने एकत्र करून त्या मडक्याला विस्तवावर ठेवले जाते . विस्तवावर ठेवलेल्या मडक्याच्या आतून खुप चांगल्या प्रकारे जर वाफ आली असेल तर अश्या वेळी ती वाफ आणि काही निर्गुडीची पाने हि एकत्र करून आपल्या ज्या भागात वात जास्त येतो अश्या भागात ते बांधले जावे. त्यामुळे वाताच्या समस्या कमी होतील किंवा एका गरम पाण्याच्या बकेट मध्ये काही प्रमाणात निर्गुडीची पाने टाका काही वेळ उकल्यानंतर त्या पाण्याने ज्या भागात वात जास्त येतो त्यावर शेकायला सुरुवात करा.

सुजेच्या ठिकाणी सुद्धा निर्गुडी च्या पानांचा वापर हा केला जातो. ज्या भागात मुक्का मार लागला आहे त्या ठिकाणच्या दुखण्याला दूर करण्यासाठी निर्गुडीच्या पानाचा वापर हा केला जातो. स्नानासाठी निर्गुडीची पाने लाभकारक आहेत . खूप दिवसांनी अंघोळ करणार असाल तर आजारातून बरे झाल्यानंतर अंघोळीला वापरल्या जाणाऱ्या पाण्यात   निर्गुडीची पाने टाकून वापरली जाते. निर्गुडी हि सर्दी , खोकला अश्या समस्या असतील त्यावेळी वाफ घेण्यासाठी निर्गुडीच्या पानांचा वापर हा केला जातो.