Sleep

झोप का आहे महत्त्वाची; जाणून घ्या त्याचे फायदे

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । दिवसभराच्या कामाने शरीर थकून जाते. त्यावेळी मात्र तुमच्या शरीराला आरामाची गरज असते. कधी कधी झोप पूर्ण नाही झाली तर त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशीच्या दैनंदिन गोष्टींवर पडतो. दुसऱ्या दिवशी फ्रेश वाटत नाही. अगदी जेवणापासून च्या सगळ्या गोष्टींवर अपुऱ्या झोपेचा परिणाम होत असतो. अपुऱ्या झोपेमुळे अनेक वेळा मानसिक आरोग्यावर हि त्याचा परिणाम होत असतो.

ब्रिटनच्या द स्लीप स्कूलचे संस्थापक डॉ. गाय मिडोज यांच्या मते, दररोज ७ ते ८ तासांची झोप घेणे गरजचे आहे. व्यवस्थित झोप घेतल्याने शरीरातील टी सेल्स या पेशी मजबूत होतात. त्यामुळे अनेक रोगांवर मात करणे सोपे जाते. टी सेल्स पांढऱ्या रक्तपेशींचा एक प्रकार आहे. त्या बाहेरून आलेल्या व्हायरसवर हल्ला करत त्यांना नष्ट करण्याचे काम करतात.विषाणूला मारणाऱ्या टी पेशी चांगल्या झोपेमुळे सक्रिय होतात

झोपेचा रोगांवर होतो परिणाम –
तुम्ही जर तुमच्या झोपण्याच्या, उठण्याच्या आणि खाण्याच्या योग्य वेळा ठरवल्या असतील तर आतील तुमच्या शरीरातील बॉडी योग्य प्रकारे काम करते. एवढेच नव्हे तर झोपदेखील चांगली येते.शरीराच्या आंतरिक भागातही झाेपेचा परिणाम जाणवतो. याला विज्ञानाच्या भाषेत सर्केडियन रिदम असे म्हणतात. तसेच योग्य झोपेमुळे टी पेशी वाढण्यास मदत होते.

पुन्हा झोप घेण्यासाठी एक पद्धत
बरेच लोक व्यायाम, सायकल चालवणे आणि फिरणे या आपल्या आवडत्या कामापासून दूर आहेत.तुम्ही तुमचे काम नियमित पुन्हा सुरू केले तर शरीराचे घड्याळ हि योग्य पद्धतीने तुम्हाला साथ देत असते. तुम्ही घरातच १० मिनिटे चकरा मारू शकता.आणि त्यानंतर तुम्ही झोप घेऊ शकता.