कारल्याचा रस कितीही कडू असला तरीही आरोग्यासाठी उत्तम; जाणून घ्या फायदे

0
153
आवडल्यास नक्की शेअर करा

हॅलो आरोग्य ऑनलाईन। वाढते वजन ही बाब निश्चितच काळजीची आहे. त्यामुळे आहारात बदल, खाण्यापिण्याच्या गोष्टींमध्ये बदल करणे जरुरीचे आहे. कारण अयोग्यवेळी खाणे पिणे, व्यायाम न करणे ही आपले वजन वाढण्याची मुख्य कारणे आहेत. अनेकदा आपण आपले अनियंत्रित वजन वाढल्या मुळे विविध आजारांना बळी पडल्याचे दिसून येते. कारण शरिरातील अनावश्यक मेद आणि bad कॉलेस्ट्रॉल वाढले की आजारांना आमंत्रण मिळते. मग यासाठी डॉक्टरच्या औषधी गोळ्या जीवन सरतेपर्यंत खाव्या लागतात. पण ही समस्या कारल्याचा रस लगेच कमी करू शकतो. होय.. कारण कारल्याचं रस वजन कमी करण्यासाठी मदत करतो. या व्यतिरिक्तही त्याचे अनेक आरोग्य वर्धक फायदे आहेत. चला तर हे फायदे जाणून घेऊयात खालीलप्रमाणे :-

– कारख्याच्या नियमित वापराने अनेक गुंतागुंतीच्या आजारांना आळा बसला आहे. अति रक्तदाब, नेत्र विकार, मज्जातंतू विकार, कारख्यात पूर्णत: अत्यावश्यक अशी जीवनसत्त्वे (जीवनसत्त्व ए बी 1. बी 2. सी) व खनिजे (कॅल्शिअम फॉस्फरस, आयर्न, कॉपर पोटेशिअम) आहेत.

  • दररोज कारल्याचा रस पिण्यामुळे जुनाट खोकला शमतो आणि आपल्याला आराम मिळतो.
  • कारल्याचा रस दमा आणि फुफ्फुसांवरील संक्रमणाच्या उपचारासाठीदेखील अत्यंत प्रभावी आहे.
  • कारल्याचा रस मधुमेहाच्या रोगांसाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. कारण कारल्याचा रस प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते.
  • कारल्याचा रस शरीराच्या आरोग्यासह त्वचेचे देखील आरोग्य जपते. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्याचे काम हा रस करतो. कारण कारल्याचा रसाचे नियमित सेवन केल्याने शरीरातील रक्त शुद्ध होते आणि परिणामी त्वचेचे आरोग्य सुरक्षित राहते.
  • आपल्या त्वचेवर मुरूम, पुळ्या, पुटकुळ्या किंवा खड्डे असतील तर या समस्यांवरही कारल्याचा रस प्रभावी मानला जातो.


आवडल्यास नक्की शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here