| |

काळ्या मिरीचे पाणी आरोग्यासाठी लाभदायी; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। काळी मिरी हा एक खड्या मसाल्यातील प्रकार आहे. चवीला तिखट पण आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असा हा पदार्थ आहे. काळीमिरी सहजपणे स्वयंपाक घरात उपलब्ध होत असते. कारण बऱ्याच पदार्थांमध्ये चवीसाठी काळीमिरी असणे गरजेचे आहे. जसे कि, पुलाव, बिर्याणी, मिक्स भाजी, छोले यामध्ये स्वाद वाढविण्यासाठी मिरीचा वापर करतात. अशी हि जेवणाचा स्वाद वाढविणारी काळी मिरी आरोग्याहीदेखील उत्तम काळजी घेते. यात असणारे अँटिऑक्सिडंट्स आणि अँटीइन्फ्लेमेटरी घटक हे त्वचा आणि शारीरिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम करते. यासाठी नियमित काळ्या मिरीचे पाणी पिणे फायदेशीर ठरते. यामुळे त्वचा अधिक चांगली बनविण्यास मदत मिळते आणि रक्तातील साखरेची पातळीदेखील नियंत्रणात आणता येते. चला तर जाणून घेऊयात काळ्या मिरीच्या पाण्याचे फायदे खालीलप्रमाणे:-

१) त्वचा होई चिरतरुण – काळ्या मिरीचे पाणी नियमित प्यायल्याने त्वचेस नैसर्गिक चमक मिळते. कारण काळ्या मिरीचे पाणी आपल्या त्वचेवर सकारात्मक परिणाम करते. वास्तविक काळ्या मिरीत अँटिऑक्सिडंट्स आढळतात. जे फ्री रॅडिकल्स डॅमेजच्या प्रभावाला रिव्हर्स करतात. हे फ्री रॅडिकल्स त्वचेच्या सेल्सला हानी पोहचवतात. परिणामी त्वचा अधिक खराब दिसते. यासाठी काळ्या मिरीचे पाणी नियमित प्यायल्याने येणाऱ्या सुरकुत्या त्वचेवर लवकर दिसत नाहीत आणि त्वचा अधिक चिरतरूण दिसते.

२) स्मरणशक्ती चांगली राहते – काळ्या मिरीचे पाणी आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. यातील काही घटक आपल्या मेंदूला डिजनरेट होण्यापासून वाचवतात. त्यामुळे मेंदू अधिक चांगल्या पद्धतीने कार्य करतो आणि स्मरणशक्तीही चांगली राहते. शिवाय ज्या व्यक्तींना पार्किन्सन्स आणि अल्जाईमरसारख्या आजारांची आनुवंशिकता आहे, त्यांच्यासाठी हा उपाय उत्तम आहे. इतकेच काय तर, शरीरातील साखर नियंत्रणात आणण्यासाठीसुद्धा काळ्या मिरीच्या पाण्याचा फायदा होतो.

३) हृदयासाठी फायदेशीर – काळ्या मिरीच्या पाण्याचे सेवन केल्यास हृदयावर याचा चांगला प्रभाव पडतो. कारण काळ्या मिरीतील पोषक तत्व वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे हृदय सुरक्षित राहते व चांगल्या तऱ्हेने काम करते. त्यामुळे आठवड्यातून २-३ वेळा काळ्या मिरीच्या पाण्याचे सेवन करणे फायद्याचे ठरते.

० अत्यंत महत्वाचे – काळ्या मिरीचे पाणी पिण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
तुमच्या शरीरासाठी या पाण्याचे किती प्रमाण असायला हवे?
ते पिण्याची योग्य पद्धत आणि वेळ कोणती?
या प्रश्नांचे समाधान करून याची व्यवस्थित माहिती घेऊन या पाण्याचे सेवन सुरू करा.