शरीराची दुर्गंधी येऊ नये म्हणून बॉडी स्प्रे वापरताय, वेळीच व्हा सावधान नाहीतर होईल ‘हे’ नुकसान
हॅलो आरोग्य ऑनलाईन । उन्हाळा सुरू आहे. दर 10 मिनिटाला टीव्ही ला जाहिरात येते, घामाच्या दुर्गंधीला वैतागून एकजण स्वताच्या अंगावर बॉडी स्प्रे मारतो आणि मग सुंदर ललनांचा घोळका त्याच्याभोवताली गोळा होतो. आणि मग तिथून पुढे त्याची लाइफ सेट होते. या आणि अश्या प्रकारचे कथानक आणि पांचटपणा असलेल्या जाहिराती तुम्हाला सारख्या बघायला मिळतात. कारण त्याचा दिवसभर रतीब चालू असतो. हा झाला टीव्ही चा विषय आपण आता रियल लाइफ मध्ये बघू, कोणत्याही दुकानात जा किंवा मेडिकल मध्ये तिथे आकर्षक रंगात ओळीने ठेवलेल्या बॉडी स्प्रे च्या बाटल्या बघून ते घ्यायची इच्छा होतेच. बाहेर जाताना स्प्रे मारून गेल्यावर स्वत: सहित इतरांना पण तात्पुरते बरे वाटते. पण काहींना परफ्युमचे एवढे व्यसन असते की, ते सतत सुगंधी राहावे म्हणून अति परफ्युमचा वापर करतात. अशा कितीतरी लोकांना तुम्ही ओळखत असाल. पण तुम्हाला माहीत आहे का? परफ्युमच्या अशा सतत वापरण्याचा परिणाम तुमच्या शरीरावर खोलवर होत असतो. परफ्युम वापरणे ही वाईट गोष्ट नसली तरी त्याच्या अतिवापराचे परिणाम तुमच्या त्वचेवर आणि एकूणच आरोग्यावर होतात. म्हणूनच आज जाणून घेऊया परफ्युम लावण्याचे दुष्परिणाम.
अस्वस्थपणा (Dizziness)
शरीरावर फोड येणे (Blisters On Body)
मळमळणे (Nausea)
डोकेदुखी (Headache)
उलटीचा त्रास (Vomiting)
अंत:स्राव प्रणालीवर परिणाम (Effects Endocrine System)
प्रजननावरही होतो विपरित परिणाम (Effects On Reproductive System)
श्वसनाचा होतो त्रास (Effects On Respiratory System)
ह्रदयाचे ठोके वाढवते (Elevated Heart Rate)
परफ्युममुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते
लहान मुलांसाठी घातक
आता जर तुम्ही परफ्युमचा वापर करत असाल तर सावध आणि जपून असा याचा वापर करा. कारण त्याचा त्रास तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. बॉडी स्प्रे च्या नियमित वापराने त्वचेवर लाल पुरळ येतात आणि अंगाला खाज सुटण्याचा त्रास होऊ शकतो. तसेच श्वास घेण्यात ही काही जणांना त्रास होऊ शकतो. तुम्ही पहिले असेल की अनेक जणांना एकदम हार्ड वास असणाऱ्या स्प्रे पासून अलर्जी पण होऊ शकते.
निसर्गाने आपल्या शरीराची रचनाच अशी केली आहे की शरीर थंड राहावे म्हणून आपल्या अंगातून घाम निघत असतो त्याचबरोबर काही विषारी घटकही त्वचेद्वारे बाहेर टाकले जात असतात. पण बॉडीस्प्रेमुळे शरीराची नैसर्गिक घाम निघण्याची प्रक्रिया प्रभावित होते. आणि घाम न आल्यामुळे उलट शरीरातून जास्तच दुर्गंध येतो. डिओ च्या सतत वापरामुळे आपले अंडरआर्म्स सुद्धा काळे पडतात. परफ्यूम व डिओ चा वापर करताना डायरेक्ट शरीरावर वापरण्यापेक्षा कपड्यावर वापरावा. जर तुम्हाला परफ्यूम वापरायचाच असेल तर नैसर्गिक पद्धतीने बनवलेला वापरला तर उत्तमच.