Boiled Egg Benefits For Men
| |

Boiled Egg Benefits For Men : पुरुषांच्या समस्यांवर उकडलेले अंडे प्रभावी; जाणून घ्या महत्वाचे 5 फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। Boiled Egg Benefits For Men सकाळी उठा.. आवरा.. आणि..? कामाला जा. पुढे ऑफिसात जा. काम करा.. घरी या.. जेवा आणि झोपा. जगातील १०० पैकी किमान ९० पुरुषांची दिनचर्या हि अशीच रटाळ आहे. यातील काहीच जण जरा बॉडी शॉडीचे शौकीन असल्यामुळे जिम करणे, धावणे, वेळेवर जेवणे आणि झोपणे अशा नियमांचे पालन करतात. पण तरीही अशा पुरुषांना आरोग्यविषयक समस्या होणार नाहीत याची खात्री कुणीच घेऊ शकत नाही. तुमची जीवनशैली कशी आहे यावर तुमचे आरोग्य अवलंबून असतेच. पण तुम्ही काय खाता यावरही तुमच्या आरोग्याचे भविष्य आधारित असते. त्यामुळे आहार नेहमी काळजीपूर्वक घ्या असे तज्ञ सांगतात.

आपण पाहिले असाल कि, आपल्या आरोग्याबाबत खूप सजग असूनही अनेक लोकांना आरोग्याच्या अनेक तक्रारी असतात. जितक्या तक्रारी महिलांमध्ये दिसून येतात अगदी तितक्याच पुरुषांमध्येही दिसून येतात. प्रामुख्याने पुरुषांमध्ये लवकर दमणे, अशक्तपणा येणे, वारंवार आजारपण, संसर्गाची तक्रार, सांधेदुखी आणि लैंगिक समस्या हे त्रास दिसून येतात. यावर सतत काय उपाय करायचे..? म्हणून सर्रास दुर्लक्ष केले जाते.

Egg

पण आपण नेहमी म्हणतो त्याप्रमाणे दुर्लक्ष करणे हि तात्पुरती पळवाट झाली. यामुळे समस्यांचे निवारण होत नाही. उलट भविष्यात गंभीर आणि त्रासदायक आजारांना सामोरे जावे लागते. मग अशावेळी काय कराल..? तर मित्रांनो अशावेळी पूर्वनियोजन महत्वाचे. होय. यासाठी आपल्या आहारात नियमितपणे काही पदार्थांचा समावेश करा. ज्यांच्या सहाय्याने या समस्यांवर मात करणे सोपे जाईल. जसे कि अंडे आणि ते हि उकडलेले. Boiled Egg Benefits For Men

आजच्या धगधगीच्या जीवनामुळे शरीरावर, मानसिकतेवर परिणामी आरोग्यावर वाईट परिणाम होणे हि अतिशय सामान्य बाब आहे. हे लक्षात घेऊन आपल्याला निरोगी आहार आणि व्यायामाची आवश्यकता आहे हे जाणून घ्या. त्यानुसार आपली जीवनशैली ठरवा. दरम्यान पुरुषांच्या शरीरातील अनेक समस्यांवर मात करण्यासाठी उकडलेल्या Boiled Egg Benefits For Men अंड्याचे सेवन करण्याचा सल्ला खुद्द डॉक्टर देतात. तसं तर अंडी वेगवेगळ्या प्रकारे आहारात घेतली जातात. कुणी अंड्याचे ऑमलेट खाणे पसंत करते. तर कुणी अंड्याची भुर्जी खाणे पसंत करते. याशिवाय अनेकांना अंड्याचा भातदेखील खायला आवडतो. ज्याची जशी आवड तशी निवड.

Egg Palak

Boiled Egg Benefits For Men मात्र आहार तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे पुरुषांनी त्यांच्या नियमित आहारात किमान १ उकडलेले अंडे खाणे जरुरी आहे. यामुळे एकतर शरीराला उच्च प्रथिनांची पूर्तता होते. यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते. तसेच शरीराला आवश्यक पोषक द्रव्यदेखील मिळतात. ज्याच्या अन्य आरोग्यविषयक तक्रारींमध्ये लाभ होतो. म्हणूनच आज आपण उकडलेले अंडे पुरुषांसाठी कसे लाभदायी ठरते ते जाणून घेणार आहोत.

० पुरुषांनी उकडलेले अंडे खाल्ल्यास होणारे फायदे (Boiled Egg Benefits For Men)

१. शारीरिक अशक्तपणा दूर होतो
दिवसभरातून केवळ १ उकडलेले अंडे जरी पुरुषांनी खाल्ले तरी त्यांची शारीरिक ऊर्जा वाढवण्यास मदत होते. शिवाय दिवसभरातील दगदग आणि तणावामुळे पुरुषांमध्ये जी शारीरिक तसेच मानसिक कमजोरी निर्माण होते ती दूर करण्यासाठी उकडलेल्या अंड्याचे सेवन फायदेशीर ठरते. उकडलेले अंडे भरपूर प्रमाणात प्रथिने उत्सर्जित करते. यामुळे ते खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि जर शरीरातील उर्जा कमी होण्याचे कारण लोह असेल तर अंड्यातील केवळ पिवळ्या भागाचे सेवन करावे. यामध्ये लोहाची मात्रा जास्त असते. Boiled Egg Benefits For Men

strong men

२) वजन नियंत्रणात राहते
जर तुमचा तुमच्या वजनावर कंट्रोल राहत नसेल तर वजन कमी करण्यासाठी उकडलेल्या अंड्याचे सेवन करा. यासाठी अंड्यातील पिवळा भाग काढून फक्त पांढरा भाग खाणे फायदेशीर आहे. Boiled Egg Benefits For Men तसेच पुरुषांनी आहारात अंड्याचा केवळ पांढरा भाग खाल्ल्यास त्यांच्या शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते. शिवाय हे अंडे खाल्ल्याने व्हिटॅमिन डी आणि प्रोटीनसारखे पोषक घटक मिळतात. ज्यामुळे हाडे मजबूत होतात. उकडलेल्या अंड्यांच्या सेवनाने सांधेदुखीदेखील दूर करता येते.

३) काम भावनेस उत्तेजना देते
उकडलेले अंडे पुरुषांमधील काम इच्छा प्रबळ करते. कारण काम हा एक प्रकारचा संप्रेरक आहे. या हार्मोनच्या कमतरतेवर मात करण्यासाठी उकडलेल्या अंड्यांचे सेवन फायदेशीर ठरते. शरीरातील लिबिडोचे प्रमाण वाढवण्यासाठी बरेच लोक औषधे घेतात. मात्र औषधांऐवजी जर दररोज एक ते दोन उकडलेले अंडे खाल्ले तर अधिक लाभ होतो. Boiled Egg Benefits For Men

४) सेक्स स्टॅमिना वाढतो
उकडलेले अंडे खाल्ल्याने पुरुषांचा स्टॅमिना वाढतो. याचा प्रजनन आरोग्यासह पार्टनरसोबत असलेल्या नात्यावर चांगला परिणाम होतो. कारण अंड्यामध्ये B5 आणि B6 हि जीवनसत्त्वे असतात. तर अंड्यांमध्ये प्रथिनेदेखील मोठ्या प्रमाणात आढळतात. ज्यामुळे पुरुषांचा स्टॅमिना वाढतो आणि त्यातील पोषक तत्व शारीरिक कमजोरी दूर करायला मदत करतात. म्हणून पुरुषांनी स्टॅमिना वाढवण्यासाठी विविध औषधे घेण्याऐवजी उकडलेली अंडी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

५) वंध्यत्वाची समस्या दूर होते
उकडलेले अंडे खाल्ल्याने पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता वाढते. परिणामी वंध्यत्वाची समस्या दूर होते. याचे कारण म्हणजे उकडलेल्या अंड्यामध्ये प्रोटीनची मात्र अधिक प्रमाणात असते. जी शरीराला मजबूत करते आणि वंध्यत्वापासून संरक्षण देते. यामुळे जर प्रजनन क्षमता मजबूत करायची असेल तर न विसरता दैनंदिन जीवनात एकवेळच्या आहारात आठवणीने एक उकडलेले अंडे खा. Boiled Egg Benefits For Men

० महत्वाचे – मित्रांनो व्यक्ती तितक्या प्रकृती असल्यामुळे आपल्या शरीराला जे योग्य आणि पूरक आहे ते डाएट करण्यावर भर द्या. यासाठी आहार तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. शिवाय हेल्थ रिपोर्टनुसार दिवसातून केवळ एक किंवा मग दोन ते तीन अंडी खाण्याविषयी डॉक्टरांकडून खात्री करून घ्या. परस्पर कोणताही डाएट ठरवू नका. तसेच जर तुम्हाला अंड्याची ऍलर्जी असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अंड्याचे सेवन करूच नका.