Brain Health : मेंदूचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; मानसिकदृष्ट्या तुम्हीही रहाल फिट
हॅलो आरोग्य ऑनलाईन । या धावपळीच्या जीवनामध्ये जसे शारीरिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, त्याच पद्धतीने आपले मानसिक संतुलन देखील चांगले असणे गरजेचे आहे. आपल्या मेंदूला निरोगी व सक्रिय ठेवणे ही काळाची गरज आहे, नाहीतर किंवा अन्य आजार तुम्हाला होऊ शकतात. याकरिता शारीरिक कसरत सोबतच मेंदूची कसरत करणे देखील जरुरी आहे. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत, जे मानसिक ताणतणावाने त्रासलेले आहेत. त्यांच्या जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीचे टेन्शन वाढलेले आहे. वारंवार तणावग्रस्त जीवन जगल्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर देखील परिणाम दिसून येतो, अशावेळी मेंदूची काळजी घेणे (Brain Health) अनिवार्य आहे. चला तर मग जाणून घेऊया अशा काही गोष्टी ज्यामुळे तुमचे मानसिक संतुलन चांगले राहील. भविष्यात तुम्हाला कोणत्याही ताणतणावाचा सामना करावा लागणार नाही त्याबद्दल..
योगा ध्यान धारणा करणे
जर तुमच्या जीवनामध्ये तणावग्रस्त परिस्थिती वारंवार येत असतील या सर्व गोष्टींमुळे तुम्ही कोणत्याही घटनेवर लक्ष केंद्रित करत शकू नसाल तर अशावेळी तुम्हाला योग व ध्यान धारणा करणे अत्यंत गरजेचे आहे. बहुतेक वेळा मेंदूचे चित्त ठिकाणावर नसल्यामुळे कोणत्याही गोष्टी आपले मन रमत नाही. मन सैरावैरा होते म्हणूनच सकाळी लवकर उठून योगा व मेडिटेशन म्हणजे ध्यानधारणा करणे गरजेचे आहे, असे केल्याने तुमच्या मेंदूच्या कार्यक्षमतेवर (Brain Health) चांगला परिणाम दिसून येईल. प्रत्येक कामामध्ये तुमचे लक्ष लागेल. जर तुम्ही मानसिक दृष्ट्या सुदृढ राहिलात तर भविष्यात तुम्हाला मेंदूशी संबंधित कोणतेही आजार होणार नाही. योगा व ध्यानधारणा केल्याने आपले शारीरिक आरोग्य व मानसिक आरोग्य सुधारते. तुम्ही घरच्या घरी देखील काही सोपे व्यायाम म्हणजेच योगाचे प्रकार करू शकता जेणेकरून तुमच्या शरीराची व मेंदूची लवचिकता सुधारून शकते.
बुद्धिबळ, सुडोकू गेम खेळणे- Brain Health
आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात, जे बुद्धीला चालना मिळण्याकरिता बुद्धिबळ व सुडोकू शब्दकोडे सोडवत असतात. जर तुम्हाला देखील असे खेळ खेळण्याची आवड असेल परंतु कामाच्या प्रेशर मुळे वेळ मिळत नसेल तर तुमच्याकरिता असे बुद्धीचे खेळ खेळणे चांगले आहे. या खेळामुळे तुमचे बौद्धिक संतुलन राखले जाईल व मेंदूला गती देखील मिळेल अशा प्रकारचे बुद्धीला चालना देणारे खेळ खेळल्याने मेंदूची सकारात्मकता वाढते व मेंदू निरोगी होऊन त्याची कार्यक्षमता देखील वाढते.
आवडती कला जोपासणे
जर तुम्हाला वारंवार निराशा जाणवत असेल, कोणतेही काम केल्यावर तुमचे मेंदू थकत असेल तर अशावेळी तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. जसे की नृत्य. नृत्य करणे म्हणजे फक्त एक शारीरिक क्रिया नसून एक मानसिक आराम देखील मानले जाते. तुम्ही तुमच्या आवडत्या गाण्यावर थोडा वेळ डान्स करा, यामुळे तुमचे लक्ष देखील दुसरीकडे वळेल व तुमचे मन जे निराश झालेले आहे ते पुन्हा सकारात्मक होऊन तुम्हाला प्रसन्नतेची भावना निर्माण करेल. डान्स केल्याने तुमच्या शरीरातील अतिरिक्त कॅलरी देखील निघून जातात व मेंदूचे मानसिक संतुलन देखील चांगले राखले जाते.
मित्र मंडळी सोबत जास्तीत जास्त वेळ घालवणे
अनेकदा आपण खूप कमी वेळ इतरांसोबत घालवत असतो परिणामी स्वतःची जास्त गप्पा मारत असतो अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्याने मनामध्ये विविध विचारांचे वादळ निर्माण होत असतात. असे जर तुमच्या बाबतीत देखील घडत असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त लोकांमध्ये वेळ व्यतीत करणे गरजेचे आहे, यामुळे तुमचे मन मोकळे होईल. तुमच्या मनामध्ये जे विचार आहेत ते देखील बदलतील विचारांचे आदान प्रदान होईल. मानसिक आरोग्य सुधारेल एकटेपणाची भावना निघून जाईल
काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा
दैनंदिन जीवन जगत असताना एकच काम वारंवार केल्याने जीवनामध्ये निराशा निर्माण होते, अशावेळी काहीतरी बदल म्हणून नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. नवीन गोष्टी केल्याने आपले लक्ष दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतून राहते व आपला मेंदू देखील चांगल्या कामांमध्ये अडकून राहतो. त्यामुळे तुमचा मेंदू नको तो विचार करत नाही. नवीन गोष्टी शिकल्याने मेंदू फ्रेश व ताजा तवाणा (Brain Health) देखील राहतो, परिणामी मानसिक दृष्ट्या तुम्ही सक्षम बनता.