| | |

ब्रेस्ट साईज कमी जास्त होते?; जाणून घ्या कारण

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेक स्त्रिया आपल्या ब्रेस्टच्या बाबत नेहमीच चिंतेत असतात. कधीकधी ब्रेस्ट साईज वाढते याच टेन्शन तर कधीकधी ब्रेस्ट साईज कमी आहे म्हणून टेन्शन. मुख्य स्त्रीयांचे ब्रेस्ट पुरूषांचे आकर्षण असल्याचं म्हटलं जातं. मात्र ही एक नैसर्गिक बाब आहे. त्यामुळे अनेक स्त्रिया आपल्या ब्रेस्टबाबत नेहमीच सतर्क असतात. ब्रेस्टची साईज कमी जास्त होणे ही अत्यंत स्वाभाविक आणि नैसर्गिक गोष्ट आहे. परंतु ब्रेस्टची साईज कमी जास्त होणे किंवा ब्रेस्ट कॅन्सर याबाबत पुरेशी माहिती नसल्यामुळे स्त्रियांमध्ये संभ्रम असतो. चला तर जाणून घेऊया यामागील कारणे आणि अधिक माहिती.
0 मुळात ब्रेस्टची साईज कमी जास्त होणे याचे प्रमुख कारण असते रात्री झोपण्याच्या चुकीच्या पद्धती. होय रात्रीच्या वेळी आपण कसे झोपतो यावरही आपल्या बेस्टची साईज अवलंबून असते. चला तर जाणून घेऊ काही खास गोष्टी –
– ब्रेस्टच्या साईज कमी जास्त असणे अत्यंत नैसर्गिक आहे. ब्रेस्ट इच्छित साईजचे नसतील तर चिंता करण्याचे कारण नाही. ही सामान्य बाब आहे. बहुतांश महिलांमध्ये डावा ब्रेस्ट उजव्या ब्रेस्ट पेक्षा किंचित मोठ्या असतात. आणि हे अतिशय साधारण आहे.

१) रात्री झोपताना एकाच कुशीवर झोपण्याची सवय असेल तर यामुळे तुमची ब्रेस्ट साईज वाढू शकते. त्यामुळे एका कुशीवर वा बाजूवर झोपणं लगेच बंद करा. त्यामुळे एकाबाजूच्या ब्रेस्टवर दाब पडतो.

२) तुम्हाला पोटावर झोपायची सवय असेल, तर हे आरोग्याच्या दृष्टीने अजिबात योग्य नाही. यामुळे तुम्ही ब्रा घालता की नाही याला काहीही अर्थ उरत नाही. त्यामुळे तुम्हाला होणाऱ्या त्रास किंवा नुकसानीपासून वाचायचे असेल तर ब्रेस्ट खाली एखादी मुलायम उशी ठेवा. या शिवाय एका कुशीवर झोपण्याशिवाय पर्याय नसेल तर, उशीमुळे ब्रेस्टला आधार मिळेल अशी उशी ठेवा.

३) स्त्रीयांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण अधिक दिसून येते. कारण बदलत्या जीवन शैलीमुळे अनेकदा शरीरात असे काही बदल होत असतात जे लवकर समजून येत नाहीत. त्यामुळे ब्रेस्टमध्ये होणारे प्रत्येक बदल घातक किंवा कॅन्सरचे नसतात. हे समजून घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला ब्रेस्टमध्ये कोणती गाठ दिसत असेल तर घाबरू नका. काही गाठी तात्पुरत्या असतात. काही वेळा मासिक पाळीच्या दिवसांमध्येदेखील असे दिसून येते. त्यामुळे जर ब्रेस्टमध्ये जास्त दिवस सूज दिसून आली तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांकडून तपासून घ्यावे.