natural look

असा आणा  चेहऱ्याला नैसर्गिक प्रकारचा ग्लो

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  आता लग्नसराईचा काळ आला आहे . त्यामध्ये प्रत्येक जण आपण सुंदर दिसण्यासाठी विशेष काळजी घेतांना दिसत आहेत. या काळात आपल्या त्वचेच्या  वेगवेगळ्या ट्रीटमेंट साठी  पार्लर मध्ये जाऊन बसावे लागते . सतत पेडिक्युअर , मॅनिक्युअर अशा विविध प्रकारच्या  ट्रीटमेंट चा वापर हा करावा लागतो. आणि काळजी पण खूप घ्यावी लागते . त्यासाठी जास्त खर्च न करता तुम्ही स्वतःच्या चेहऱ्यावर ग्लो मिळवू शकता . कसे ते जाणून घेऊया …….

पोट हवे साफ —

त्वचेला कितीही क्रिम लावा किंवा काहीही करा जर तुमचे पोट साफ नसेल तर तुमच्या चेहऱ्याला ग्लो कधीच येणार नाही. कामांच्या वेळांमुळे किंवा सकाळी उठून जाण्याचा कंटाळा केल्यामुळे अनेकांचे पोट साफ होत नाही. जर तुम्हाला शौचाला जाण्याचा त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि जर साधा सोपा उपाय हवा असेल तर रात्रीचे जेवण वेळेवर घ्या. झोपण्याआधी एक ग्लास पाणी घेऊनच झोपा. सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्या. त्यामुळे पोट लगेच साफ होते . चेहऱ्यावर परिणाम हा पोट साफ झाल्याने लगेच जाणवू शकतो.

लिंबू-मध पाणी—

सकाळी उठल्या उठल्या उपाशीपोटी कोमट पाण्यात लिंबू आणि मध घाला. वजन कमी करणाऱ्यांना हे पाणी पिण्याची सवय असेलच. दिवसाची सुरुवात चहाने करत असाल तर ही सवय बदला. लिंबू – पाण्याने एनर्जी वाढण्यास मदत होते . जेवण झाल्यानंतर कोमट पाण्यात लिंबाचा वापर करून ते आहारात घ्या. कोमट पाण्यात लिंबू आणि मध घालून प्या. लिंबांमध्ये व्हिटॅमिन  सी असते. लिंबामुळे तुमच्या त्वचेला ग्लो येतो. त्यामुळे दररोज सकाळी लिंबू-मध पाणी प्या .

बीटाचा रस —

बीटाचा रस हा  आयुर्वेदीक आहे . त्याचा वापर हा रक्त शुद्ध करण्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो. रक्त शुद्ध झाल्याने पोटाच्या इतर समस्या या निर्माण होत नाहीत . तसेच बीट हे आरोग्यदायी असून आरोग्यवर्धक सुद्धा आहे . बीटाचा रस बनवण्यासाठी गाजर किंवा काकडीचा वापर करून तयार करू शकतो.