|

लोणी आणि बदाम तेल त्वचेला देईल नैसर्गिक सौंदर्य; कसे ते जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। चमकदार, डागमुक्त आणि नितळ सौंदर्य असणारी त्वचा प्रत्येकाला हवीहवीशी वाटते. पण यासाठी आपल्या काही सवयी बदलून नव्या गोष्टींची सवय लावून घ्यायला हवी. यात प्रामुख्याने सकाळी लवकर उठण्याची सवय आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असते. मात्र, सुंदर त्वचा मिळवण्यासाठी फक्त तेवढेच पुरेसे नसून त्यासाठी त्वचेला खोलवर मॉइश्चरायझ करणे खूप आवश्यक आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला माहित असलेल्या दोन पदार्थांपासून त्वचेचे नैसर्गिक सौंदर्य कसे मिळवता येईल हे सांगणार आहोत. हे दोन पदार्थ म्हणजे लोणी आणि बदामाचे तेल. तर जाणून घेऊयात उपाय:-

१) या उपयासाठी आपल्याला १ चमचा लोणी आणि १ चमचा बदामाचे तेल एकत्रितपणे मिश्रित करून घ्यायचे आहे. यानंतर त्या तेलाने आपल्या त्वचेवर हलक्या हाताने मसाज करा. आठवड्यातून किमान दोन वेळा असे केले असता आपली त्वचा कोणत्याही हानीशिवाय खोलवर मॉइश्चरायझ होते.
* लक्षात ठेवा :-
– यासाठी लोणी हे नेहमीच ताजेच वापरावे.
– लोणी आणि तेलाने मॉइश्चरायझिंग केल्यावर घराबाहेर पडताना नेहमी अगोदर अंघोळ करणे गरजेचे आहे. कारण तेलामुळे हातापायांवर धुळ चिकटून बसते

२) या उपायासाठी लोण्यामध्ये 3 ते 4 चमचे बेसन पीठ आणि लिंबाचा रस घाला. आता ही पेस्ट टॅन झालेल्या भागावर लावा आणि कोरडे होऊ द्या. मिश्रण चांगले कोरडे झाल्यावर त्वचा पाण्याने धुवा. आपल्याला काही दिवसांतच याचा फरक दिसून येईल.
*लक्षात ठेवा :-
– हि पेस्ट वापरण्यापूर्वीच त्यात लिंबाचे थेंब टाका. अधिक काळ बनवून ठेवू नये अन्यथा लिंबातील सायट्रिक ऍसिड त्वचेला हानी पोहचवू शकते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *