cucumber
|

काय सांगता , काकडीच्या सेवनाने कमी होतो किडनी स्टोन

हॅलो आरोग्य ऑनलाईन । काकडी हि नेहमी उन्हाळ्याच्या दिवसांत खाल्ली जाते , कारण काकडी हि खूप थंड असते . त्यामुळे शरीरातील उष्णता योग्य  प्रमाणात राहण्यासाठी काकडी खाल्ली जाते . काकडी हि आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे .  काकडी ची शीतलता खूप जास्त प्रभावी असते . तसेच जर तुम्हाला उष्माघाताचा त्रास असेल तर त्यावेळी काकडी हि लाभकारक ठरते . त्याचबरोबर काकडीचे सेवन केल्याने किडनी स्टोन च्या समस्या या कमी होतात.

काकडीमध्ये मॅग्नेशियम , फॉस्फरस आणि फायबर याचे प्रमाण जास्त असते . त्यामुळे इतर पदार्थ पचायला मदत होते . ज्या लोकांना मधुमेह आहे . त्या लोकांनी सुद्धा आहारात काकडीचा समावेश करावा. त्यामुळे शरीरात इन्सुलेशन चे प्रमाण वाढण्यास मदत होते . मधुमेहाचा जास्त धोका हा निर्माण होत नाही. जी परिपकव काकडी असेल तर त्या काकडीचे काही दाणे हे जर पाण्यात रात्रभर भिजत ठेवून जर दररोज सकाळी खाल्ले तर मात्र किडनी स्टोनचा धोका हा कमी होऊ शकतो. तसेच किडनी स्टोन हा निघून जाण्यास मदत होते.उन्हाळ्याच्या दिवसांत काकडी हि दररोज आहारात ठेवली गेली पाहिजे .

काकडीमध्ये स्टिरॉल घटक हा जास्त असतो. त्यामुळे जबडा किंवा दाताच्या समस्या असतील तर त्यावेळी काकडी हि आहारात घ्यावी. तसेच ज्या लोकांचं काम हे सतत लॅपटॉप वर असते. त्या लोकांनी संध्याकाळी झोपताना काकडीचे तुकडे हे आपल्या डोळ्यांवर ठेवावेत. त्यामुळे डोळ्यांना जास्त त्रास होणार नाही . जर आपल्याला केस वाढवायचे असतील तर त्यावेळी आहारात काकडीचं जास्त सेवन करा .