Bye bye to the gum problem

हिरड्यांच्या समस्येला करा बाय बाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या कामाच्या व्यापाने कधीकधी आपल्या दातांकडे  दुर्लक्ष  होत असते. दातांच्या समस्या जर निर्माण झाल्या तर मात्र खूप जास्त प्रमाणत त्रास जाणवायला सुरुवात होते.  दातांचे दुखणे हे वाढीला लागले असता, त्याच्यामुळे कान, डोके सुद्धा दुखायला सुरुवात होते. अश्या वेळी हिरड्यांचे दुखणे कमी करणे हे जास्त आवश्यक असते.

हिरड्यांच्या दुखण्याने दातांमधून पु येणे , सूज येणे , गाल  सुजणे या  समस्या  निर्माण होतात.  त्यामुळे  अतिशय जास्त प्रमाणात वेदना  जाणवतात. आपल्या दररोजच्या काही चुकीच्या सवयी सुद्धा दात दुखण्याला कारणीभूत असतात . आपण जेवताना खूप भरभर जेवतो, जेवताना पाण्याचे प्रमाण हे जास्त ठेवतो. तसेच पाणी पिताना शांत किंवा बसून पाणी पीत नसल्याने आरोग्याच्या समस्या या निर्माण होतात. त्यामुळे लाळेचे तंत्र हे पूर्णतः बदलते. त्यामुळे हिरड्यांच्या दुखण्यात वाढ होते.

हिरड्या जर जास्त प्रमाणत दुखत असतील तर अश्या वेळीं आपल्या वापरातील  आयुर्वेदीक औषधांचा उपयोग  केला जावा. त्यामुळे लाळेचा प्रश्न हा कमी होऊन आपल्या हिरड्याना त्रास  कमी कमी होत जातो. हिरड्या या मजबूत राहण्यासाठी घरगुती पद्धतीने आवळा आणि त्रिफळा याचे  चूर्ण  तयार करू शकता. त्याच्यामध्ये काही प्रमाणात आवळा आणि सुपारी याचे मिश्रण वापरा. आवळकाठी , बाभूळ साल आणि कडुलिंब साल यांचे मिश्रण एकत्र तर करून ते आपल्या हिरड्यांसाठी वापरा. त्याने नक्कीच तुमच्या हिरड्यांचे आराम मिळण्यास मदत होईल .