Unwanted Hair
|

चेहऱ्यावर येणाऱ्या अनावश्यक केसांना करा बाय बाय; जाणून घ्या सोप्पे आणि घरगुती उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकाल हार्मोन्सचे असंतुलन आणि आनुवंशिक कारणांमुळे चेहऱ्यावर नको असलेले केस येण्याचे प्रमाण वाढले आहे. या केसांमुळे चारचौघात जातेवेळी आत्मविश्वासावर प्रश्नचिन्ह येते. कारण या अनावश्यक केसांमुळे सौन्दर्यावर गदा येते आणि पूर्ण लूक खराब होऊन जातो. यावर उपाय म्हणून वारंवार थ्रेडिंग आणि वॅक्सिंग करणे कामाच्या गडबडीत शक्य होत नाही. त्यात सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पार्लर बंद आहेत. त्यामुळे महिलांची गैरसोय झाली आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला असे काही घरगुती आणि सोप्पे उपाय सांगणार आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही नको असलेले केस काढू शकता.

यातील पहिला उपाय म्हणजे मसुराची डाळ, बटाटा, लिंबू आणि मधाशी निगडित आहे. या उपायासाठी आपल्याला अर्धा कप मसूरची डाळ, एक बटाटा, एका लिंबाचा रस आणि १ मधाचा थेंब इतकेच आवश्यक आहे. मसुरची डाळ रात्रभर भिजवून सकाळी त्यातील पाणी काढून मिक्सरमध्ये त्याची जाडसर पेस्ट बनवा. सोबत बटाट्याची साल काढून त्याचा रस काढून घ्या. यानंतर मसूरची पेस्ट आणि बटाट्याचा रस एकमेकांत व्यवस्थित मिसळा. पुढे या मिश्रणात लिंबाचा रस आणि मध घाला. हे मिश्रण बाधित भागावर लेपाप्रमाणे लावून अर्धा तास असेच ठेवा. त्यानंतर हा मास्क हळूहळू सुकायला लागल्यानंतर आपल्या बोटांच्या साहाय्याने तो काढून टाका.

याशिवाय एका पात्रात एक कप चण्याचे पीठ अर्थात बेसन त्यासोबत २ छोटे चमचे वापरातील हळद, १/२ छोटा चमचा ताजी दुधावरची मलाई आणि एक कप रूम टेम्प्रेचर दूध घालून जाडसर पेस्ट तयार करा. आता चेहऱ्यावर ज्या भागात नको असलेले केस असतील त्या भागावर हा पॅक लावा. साधारण अर्धा ते पाऊणतास हा फेस पॅक लावून सुकेपर्यंत ठेवा. त्यानंतर हळूवारपणे केसांच्या वाढीच्या विरुद्ध दिशेने त्यास चोळा व त्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. हा पॅक आठवड्यातून किमान दोनवेळा वापरा. यामुळे नक्कीच तुम्हाला नको असलेल्या केसांपासून सुटका मिळेल.

तसेच ब्लीचिंग आणि थ्रेडींग करून देखील चेहऱ्यावरील नको असलेले केस काढून टाकता येतात. हा उपाय महिला आणि पुरुष दोघेही आपल्या वापरात आणू शकतात. मात्र ब्लीचिंग करण्याआधी ते तुमच्या त्वचेला हानिकारक तर नाही ना हे तपासणे आवश्यक आहे. तसे न केल्यास त्वचेला गंभीर इजा होण्याची शक्यता असते. थ्रेडिंगच्या माध्यमातून नको असलेले केस काढता येतात. गाल आणि भुवयांच्या मधे असलेले केस महिला प्लकिंग करुन काढू शकतात. चेहऱ्यावर नको असलेले केस हे महिलांच्या ओठांच्या वर, माथ्यावर, गालांवर आणि नाकावर असतात. तर परुषांच्या गालांवर आणि भुवयांच्या मधे हे केस दिसतात. त्यासोबत चेहऱ्यावर हे केस कुठेही येऊ शकतात.