Can grow nails, use this method

नखे  वाढण्यासाठी करू शकतो, या पद्धतीचा वापर 

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपले नखे जर सुदंर असतील तर तुमच्या सौदर्यात हा खूप फरक पडलेला दिसतो. नखे सुबक आणि आकर्षण करण्यासाठी तुमची नखे हि मोठी असतील तर अजून आकर्षकपणा यायला सुरुवात होते. त्यासाठी नखे वाढवण्याचे काही टिप्स आहेत , त्या टिप्स चा वापर हा आपण  करू शकतो . कसे ते जाणून घेऊया …..

अनेक मुलींना नखे वाढवलेली आवडतात. पण त्यावेळी नखांची वाढ हि जास्त झाली असेल तर त्यावेळी ती नखे आपोआप तुटून पडतात. तसेच स्वयंपाक करताना मात्र काही नखे हि  तुटण्याची दाट शक्यता असते . काहींची नखे हि वाढतच नाहीत . त्यामुळे नखे वाढण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात.  असा वेळी घरगुती उपाय   करूयात …

— नारळाचे तेल

नारळाचे तेल हे फक्त तुमची त्वचा आणि  केसांना  मुलायम करत नाहीत तर , आपली नखे सुद्धा वाढवण्यासाठी त्याची मदत होते . नारळाचे तेल पावभार घ्या . त्याच्यामध्ये काही प्रमाणात रोझमेरी या तेलाचा वापर करा. काही वेळ हे तेल मंद आचेवर गरम करा. हे तेल आपल्या हाताला लावा किंवा तसाच हात हा तेलात टाकून काही वेळ ठेवा. हा प्रयोग कमीत कमी आठवडाभर करा . म्हणजे तुमच्या नखांच्या वाढीला पोषक वातावरण तयार होऊन नखे हि वाढीला लागतील.

— दूध आणि अंडे

आहारात दुध आणि अंडे घेतली तर त्यामुळे आपल्या प्रतिकार शक्तीत वाढ तर होतेच तसेच आपल्या हाडांना मजबूत करण्याचे काम दूध आणि अंडी करत असतात . नखांचा काही भाग हा वाढवण्यासाठी सुद्धा दुधाचा वापर केला जाऊ शकतो. काही प्रमाणात दूध घ्या त्याच्यामध्ये अंड्याचा पांढरा भाग  त्या दुधात मिक्स करा. एकसारखा हा भाग मिक्स झाल्यानंतर काही वेळ आपले हात दुधात घालून ठेवा. त्यामुळे त्वचा पण उजळते तसेच नखे पण वाढण्यास मदत करते .

— लसणाची पेस्ट

आपल्या आहारात लसूण असणे गरजेचे आहे . लसणामध्ये जास्त प्रमाणात लोह असते . काही प्रमाणात लसणाची पेस्ट हि घ्या. त्यामुळे तुमच्या नखांच्या वाढीला पोषक वातावरण तयार होऊन नखे वाढू शकतात.