Tuesday, January 3, 2023

पुरुषांना पण असू शकतो का स्तनांचा कॅन्सर ?

आवडल्यास नक्की शेअर करा

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आत्तापर्यंत सगळ्या ठिकाणी जनजागृती हि स्त्रियांच्या स्तनांच्या बाबतीतच केली जात आहे. स्त्रियांना होणाऱ्या स्तनांच्या कॅन्सरविषयी सगळीकडे माहिती सहजरीतींने उबलब्ध होते. अनेक ठिकाणी त्याची चर्चाही होते. स्त्रियांना स्तनांचा कर्करोग होतो हे सर्वत्र ज्ञात झाले आहे. पण पुरुषांना होणाऱ्या स्तनाच्या कर्कविषयी माहिती मात्र सहजरित्या उपलब्ध नाही. पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर होतो कि नाही हेच बऱ्याच लोकांना माहिती नसते. त्याबध्दल आज जाणून घेऊया ….

हो ! पुरुषांना स्तनांचा आजार हा होतो. अनेकांना असे वाटते कि , पुरुषांना अश्या आजारांना सामोरे जावे लागत नाही. पण हा आजार स्त्रियांबरोबर पुरुषांना सुद्धा होऊ शकतो. त्याचिया कारणे वेगवेगळी आहेत. पुरुषानं स्तन नसतात , म्हणजे स्तनाचा कर्करोग होणे शक्य नाही, असे वाटणे साहजिक आहे. पण पुरुषांना सुद्धा ब्रेस्ट टिश्यूज असतात. महिलांमध्ये असलेल्या हार्मोन्स च्या बदलामुळे आणि प्रभावामुळे स्त्रियांच्या स्तनाचा आजार हा वाढत जातो. पण पुरुषांमध्ये असे हार्मोन्स आढळत नाहीत म्हणून पुरुषांचे स्तन हे लहान आणि अविकसित राहतात. त्यामुळे पुरुषांची छाती हि सपाट असते.

पुरुषांमध्ये होणाऱ्या स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण हे कमी आहे. स्त्रियांच्या मानाने पुरुषांना हा रोग लवकर आणि सहजासहजी होत नाही. या आजारामध्ये जास्त मृत्यू पावण्याची शक्यता हि महिलांमध्ये असते, पुरुषांमध्ये मृत्यूचे प्रमाण हे कमी आहे. वेळीच उपचार नाही केले तर मात्र मोठ्या संकटांना सामोरे जावे लागू शकते.जर दोन्ही स्तनांच्या आकारात फरक असेल किंवा कुठे गाठ आल्याचे जाणवले तर त्वरित डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करायला हवी. पुरुषामध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचे कारण म्हणजे शरीराची अस्वच्छता , वाढत असणारे वय, मद्यपाना अतिशय करणे अशी अनेक कारणे आहेत .


आवडल्यास नक्की शेअर करा

हे तुम्ही वाचायलाच हवे...