Why is the risk of heart attack increasing in youth?
|

हार्ट अटॅक नसला तरी या कारणाने छातीत कळ येऊ शकते ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  जर आपल्या छातीत अचानक दुखू लागले तर मात्र हार्ट अटॅक आहे , असेच गृहीत धरले जाते . हार्ट अटॅक आला तर साधारण काही प्रमाणात छातीत कळ यायला सुरुवात होते. छातीत कळ असेल तर नेहमी हार्ट अटॅक असेल असे काही नाही . वृद्ध लोक यांना अशा पद्धतीचा त्रास हा नेहमीच होत असतो. कधी कधी छातीत जास्त दुखू लागते . पण त्याची कारणे काय आहेत ते जाणून घेऊया……..

फुफुसांचा रोग —

जर तुम्हाला काही प्रमाणात फुफुसांचा त्रास  असेल किंवा फुफुसांवर जास्त प्रमाणात सूज येत असेल त्यावेळी छातीत सौम्य प्रकारचे दुखू लागते . अनेक वेळा फुफुसांच्या आजारामध्ये न्यूमोनिया याचे प्रमाण हे जास्त असते . खूप काळ जर सर्दी तशीच छातीत साठून राहिली असेल त्यावेळी सुद्धा या समस्या जास्त जाणवतात .

छातीच्या आतील भागात सूज —

छातीचा अंतर्गत भाग हा एकमेकांच्यात गुंतलेला असतो. कधी कधी जर आतील भाग हा अचानक सुजायला सुरुवात होते . त्यावेळी मात्र साधा जरी खोकले तरी जास्त प्रमाणात श्वास हा रोखला जाऊ शकतो. वैद्यकीय भाषेत ह्याला प्लुरायटिस असे म्हणतात.ही स्थिती बहुतेक अशा लोकांमध्ये आढळते ज्यांना पूर्वी निमोनियाचा त्रास होता.

बरगड्या मोडणे —

जर कधी कधी छातीत जास्त दुखत असेल तर बरगड्या या मोडल्या गेलेल्या असतात. नसांमध्ये जर जास्त प्रमाणात सूज आली असेल तर त्यावेळी पाठीच्या कणांचा भाग हा जास्त दुखू लागतो. अनेक वेळा वातावरणात जर थंडावा असेल तर मात्र बरगड्या यांना त्रास होऊ शकतो.

ऍसिडिटी —-

बहुतेक लोकांना ऍसिडिटी असल्यावर देखील छातीत दुखणे सुरु होते. जेव्हा ऍसिड वरच्या बाजूला येते तेव्हा  ढेकर येतात, छातीत हळू-हळू वेदना होऊ लागते. अशा परिस्थितीत छातीत दुखण्याची चिंता करण्या ऐवजी ऍसिडिटीचा त्वरितच उपचार केला पाहिजे. पोट ठीक झाल्यावर हे दुखणे देखील आपोआप ठीक होते. त्यामुळे ऍसिडिटी पासून दूर राहण्यासाठी आहारात योग्य प्रमाणात पाण्याचा समावेश करणे आवश्यक आहे .