Why is cancer the leading cause of death in the world?
|

जगातील जास्त लोकसंख्या मृत्यूचे कारण म्हणजे कॅन्सर

हॅलो आरोग्य ऑनलाईन । जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच जाहीर केलेल्या यादीमध्ये सगळ्यात जास्त लोकांचा मृत्यू हा कॅन्सर मुळे झाला आहे असे वर्तवण्यात आले आहे. कॅन्सर हा आजार कोणत्याही वयातील लोकांना होऊ शकतो. सुरुवातीला साधारण वाटलेला हा आजार नंतरच्या काळात हा जास्त त्रास जाणवायला सुरुवात होते. आपल्या जीवनात झालेल्या बदलामुळे सुद्धा या आजाराला समोरे जावे लागत आहे. दिवसेंदिवस लोकांचे राहणीमान तसेच कामाचा असलेला प्रेशर यामुळे सुद्धा आपल्याला अश्या रोगाला सामोरे जावे लागते.

ट्युमर सारख्या आजाराला सुद्धा सामोरे जावे लागते. ट्यूमरमधील सर्व प्रकारच्या पेशी सारख्या नसतात. आपल्या शरीराच्या छोट्याश्या भागात सुद्धा हा ट्युमर हा तयार होतो. एका छोटाश्या भागात सुमारे 1% मध्ये कॅन्सरच्या स्टेम सेल्स असतात. सीएससी मानवी शरीराच्या बऱ्याच सामान्य स्टेम पेशींसारखे असतात कारण त्या प्रचंड मोठ्या संख्येने आढळतात आणि स्वत:चे पुनरुज्जीवन करण्याची क्षमता देखील त्यांच्यात असते. या पेशी शरीरात कॅन्सरचा प्रसार करायला आणि विभाजन आणि फरक करून नवीन ट्यूमर पेशी बनवायला मदत करतात.

कॅन्सरची लक्षणे साधारण प्रत्येक मनुष्यता हि वेग वेगवेगळी असतात. त्यामधील ठराविक लक्षणे आपण पाहुयात ….

— प्रमाणापेक्षा जास्त वजन वाढणे किंवा कमी होणे.

— अशक्तपणा आणि थकवा जास्त जाणवणे.

— त्वचेवर वारंवार जखमा होणे.

— त्वचेखाली एखादी गाठ जाणवणे.

— श्वासोच्छवासाला त्रास होणे आणि एका महिन्यापेक्षा जास्त काळ खोकला असणे.

—- त्वचेतील बदल, जसे की अस्तित्वात असलेल्या मस किंवा तीळाच्या आकारात बदल होणे किंवा व्रण दिसणे.

— त्वचेवर सहजपणे खरचटणे.

— जुलाब किंवा बद्धकोष्ठता यासारख्या पचनाच्या समस्या जाणवणे.

— गिळायला त्रास होणे.

— भूक न लागणे.

— आवाजात बदल जाणवणे.

—- वारंवार ताप किंवा रात्री घाम येणे.

—– स्नायू किंवा सांधे दुखणे आणि जखम भरून निघण्यास उशीर लागणे.

—- वारंवार होणारे इन्फेक्शन.