How to take care of a premature baby?

लहान बाळांसाठी खरेदी करताना घ्यावयाची काळजी

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या घरात जर एखादे बाळ असेल तर त्यावेळी बाळाच्या आरोग्यसाठी खूप काळजी हि घ्यावी लागते . बाळाची काळजी घेताना त्याला त्याच्या वेगवेगळ्या मूड प्रमाणे वागवले तर ते बाळ आंनदी राहते . बाळाला जीवनाश्यक असलेल्या वस्तू खरेदी करताना आपल्या बाळाला कोणत्या वस्तू योग्य आहेत , याचा विचार या करूनच बाळासाठी वस्तू या खरेदी केल्या पाहिजेत .

बाळाला नेहमी कपडे खरेदी करताना —

बाळाला जर तुम्ही नवीन कपडे खरेदी करत असाल तर अश्या वेळी नेहमी त्याची कपडे हि वाढत्या अंगाची असलेली बरी राहतात. कारण लहान मुलाचे शरीर हे नेहमीच एकसारखे राहत नाही . त्यामुळे काही दिवसांतच बाळाला ते कपडे अपुरे पडतात . त्यामुळे कदाचित तुमचे पैसे आणि वेळ हे दोन्ही वाया जाऊ शकते . तसेच नेहमी कपडे घेताना मुलांना टोचली जातील अशी कपडे घेऊ नका . त्यामुळे मुलांच्या शरीरावर रॅशेस यायला सुरुवात होते . ते सहन करणे मुलाना कदाचित कठीण जाऊ शकते .

साधे कपडे खरेदी करा— —

खरेदी करत असताना आपल्या मुलांना ऋतूप्रमाणे खरेदी करा. वातावरणात होणाऱ्या बदलामुळे मुलांना त्रास होतो त्यामुळे त्या त्या वेळेत योग्य असतील अशीच कपडे खरेदी करा. मुलांना वापरण्यासाठी अगदी साधी कपडे घ्या . तसेच त्याच्यावर असलेल्या किंमतीचा अभ्यास करून खरेदी करा. कारण जर तुम्ही खूप महाग अशी कपडे घेतली तर मात्र काही दिवसांतच ते एका कोपऱ्यात जातात. त्याचा पुरेपूर वापर हा होत नाही .

वाजवीपेक्षा जास्त पैसे खर्च करू नका —

लहान मुलांवर आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च केला जाऊ नये . त्याला जितक्या वस्तू जीवनाश्यक आहेत इतकेच खरेदी करा. त्यांच्या खेळण्यावर सुद्धा नवीन वस्तू आहे म्हणून जास्त खर्च करू नका . मुलांना खेळणी घेताना नेहमी जास्त धारदार असतील अशी खेळणी घेऊ नका . मुलांना इजा होऊ शकते .