Care to take as a single parent

सिंगल पालक असाल तर कशी घ्याल मुलांची काळजी?

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आयुष्यभर कोणताच माणूस हा  एकटा  जगू शकत नाही.  आपले जीवन  हे  सुखरूप जगायचे असेेेल तर कोणी तरी मदतीला असणे गरजेचंं असत.  आपल्या मुलांची जबाबदारी एकट्याने पेलणे फारच अवघड जाते . त्यामुळे मुलांच्या वाढीसाठी आई आणि वडील दोघे सुद्धा मुलांच्या सोबत असणे आवश्यक असते . सुरुवातीला जरी एकट्याने मुलांची जबाबदारी स्वीकारली असली तरी कधीतरी आयुष्यात पार्टनर येतोच अश्यावेळी मुलांचा विचार कसा करावा हा प्रश्न असतोच . त्यामुळे काही गोष्टी लक्षात ठेवूया …

— जर तुमच्या आयुष्यात कोणी पार्टनर आला तर सर्वात आधी तुमच्या मुलाच्या मनाचा विचार करा. ते या नव्या मेंबरबाबत कसा विचार करतील. मुले त्या व्यक्तीला महत्व देतील का ? तसेच मुलांच्या मनात क्या गोंधळ सुरु आहे. ते माहित करून घ्या .

— या नव्या मेंबरबाबत मुलांशी बोलताना या गोष्टीचा विश्वास निर्माण करा की, तुमच्या आयुष्यात सर्वात आधी मुलांची जागा असेल नव्या मेंबरची नाही.

— मुलांचा मूड पाहून याबाबत त्यांच्याशी बोला. अनेक मुलांना आपल्या आयुष्यात इतर कोणी नको असते. कारण त्यांना फक्त तुमचीच सवय झालेली असते. अश्या वेळी मुलांना समजून सांगा . आणि नवीन पार्टनर ला मुलांशी बोलण्याचा किंवा मैत्री करण्याचा प्रयत्न करा असे सांगा .

— मुलांना तुमच्या आयुष्यात आलेल्या मेंबर बाहेरून कळण्याआधी तुम्ही मुलांशी स्वतः बोला.

— जर मुलं या नव्या मेंबरसाठी तयार असतील तर नव्या मेंबरला कधीही तुमच्या आणि मुलांच्यामध्ये येऊ देऊ नका.

या नव्या मेंबरला हळूहळू तुमच्या आयुष्यात जागा द्या, म्हणजे मुलांवर कोणत्याही प्रकारचा दबाव येणार नाही.