| | |

गाजर ज्यूस ‘या’ लोकांसाठी घातक; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। गाजर खाण्याचे अनेको आरोग्यविषयक फायदे होतात हे आपण सारेच जाणतो. पण कधी गाजर खाल्ल्यामुळे किंवा गाजराचा ज्यूस प्यायल्यामुळे आरोग्याचे नुकसान झाल्याचे ऐकले आहे का? नाही ना? पण मित्रांनो असे काही लोक आहेत ज्यांच्यासाठी गाजर अत्यंत घटक ठरू शकत. या लोकांसाठी गाजर खाणे म्हणजे एखाद्या रोगाला स्वतःहून आमंत्रण देण्यासारखे आहे. खरंतर गाजर हे एक मुबलक पोषकतत्व असलेलं कंदमुळ आहे. गाजरात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स अॅंटी ऑक्सिडंट आणि बिटा केरोटीन असतात. जे शरीराचे आरोग्य राखण्यास मदत करतात. पण तरीही काही लोकांसाठी गाजर विषारी होऊन बसते. आता इतके आरोग्यदायी फळ कुणासाठी घातक आहे हे जाणून घ्यायचे असेल तर हा लेख जरूर पूर्ण वाचा. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) मधुमेह रूग्ण – मधुमेहाच्या रुग्णांना गाजरच्या रसाचे सेवन करणे घातक मानले जाते. कारण गाजरात साखर जास्त असते आणि हि साखर मधुमेहींच्या आरोग्याचे नुकसान करू शकते. यामुळे जास्त प्रमाणात गाजर खाल्ल्याने मधुमेहींमध्ये ग्लूकोजची पातळी वाढते आणि त्यांना अस्वस्थ वाटते. म्हणून मधुमेहाच्या रुग्णांनी गाजराचा रस पिऊ नये.

२) उच्च रक्तदाब रुग्ण – ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाची समस्या आहे, त्यांनी जास्त प्रमाणात गाजराचा रस पिऊ नये. कारण गाजरातील घटकांमुळे रक्तदाब वाढतो आणि परिणामी हृदय विकाराचा धोका संभवतो.

३) अल्सरचे रुग्ण – अल्सरच्या समस्येने ग्रासलेल्या लोकांनी गाजरचा रस पिऊ नये. कारण यामुळे पोटात गॅस, अतिसार, फुशारकी आणि पोटातील वेदना यासारखरं पाचक विकार होतात.

४) लठ्ठ व्यक्ती – लठ्ठपणामुळे पीडित लोकांसाठी गाजर रस हानिकारक ठरतो. कारण गाजरच्या रसात जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट आढळतो. यामुळे त्याचे सेवन केल्यास शरीरात लठ्ठपणा येतो.

५) स्तनदा माता – स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी गाजरचा रस पिणे योग्य नाही. कारण यात आढळणाऱ्या घटकांनी दुधाची चव बदलते. यामुळे आई व बाळाच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. याशिवाय गाजराच्या रसाचे जास्त प्रमाणात सेवन करणे आई आणि मुलासाठी धोकादायक ठरू शकते.