|

स्मरणशक्ती कमी होण्याची कारणे; उपाय, आहार, आयुर्वेदिक उपचार आणि व्यायाम (उत्तरार्ध)

हॅलो आरोग्य ऑनलाईन : पूर्वीच्या काळी मोबाईल फोन नसूनसुद्धा लोकांची स्मरणशक्ती चांगली होती. त्यांना कितीतरी गोष्टी लक्षात राहायच्या. अगदी कितीही जुने दाखले, हिशोब, गणितं त्यांना अगदी तोंडपाठ असायची. पण आता मात्र लोकांना मोबाईल फोन घेतल्याशिवाय काही आठवणार नाही. सगळ्या गोष्टी एका क्लिकवर करायची सवय लागली आहे. पण समजा काही कारणास्तव तुमच्याकडे मोबाईल फोन नसेल. अशावेळी मात्र तुम्हाला तुमच्या बुद्धीवर जोर द्यावा लागेल की नाही. म्हणूनच स्मरणशक्ती वाढवण्यासाठी योगासने या विषयी अधिक माहिती घेणार आहोत मग करुया सुरुवात.

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी योगासने (Yoga To Increase Memory In Marathi)

सगळ्यात आधी आपण सुरुवात करणार आहोत स्मरणशक्ती वाढवण्यासाठीच्या योगासनांनी. योगासनांचे शारीरिक फायदे तर सर्वश्रुत आहेतच. पण योगा तुमच्या स्मरणशक्ती आणि बुद्धीसाठीही चांगला आहे. जाणून घेऊया नेमका कोणता योगा प्रकार तुमच्या स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायद्याचा आहे.

  • सर्वांगासन : स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सगळ्यात पहिलं आसन आपण पाहणार आहोत ते सर्वांगासन. सर्वांगासनामध्ये तुमचे दोन्ही पाय हवेत वर करायचे असतात. असे करताना तुम्हाला कमरेकडून आधार द्यायचा असतो. या आसनामुळे तुमच्या मेंदूला योग्य तो रक्तपुरवठा होतो. मेंदूला झालेल्या योग्य रक्तपुरवठ्यामुळे तुमचा मेंदू कार्यरत राहतो. त्यामुळे याचा फायदा तुम्हाला स्मरणशक्ती वाढवण्यासाठी होतो.

  • भुजंगासन:  भुजंगासनामध्ये तुम्हाला सापाप्रमाणे मान मागे करायची असते म्हणूनच याला cobra pose असे सुद्धा म्हणतात. तुम्हाला पोटावर झोपून हाताच्या मदतीने अंग उचलायचे आहे. असे करताना तुम्हाला तुमचे डोके पाठीच्या दिशेने झुकवायचे आहे असे करताना तुम्हाला या आसनामध्ये काही किमान 1 मिनिटं तरी तसेच राहायचे आहे. यामुळे तुमच्या मज्जासंस्थेला चालना मिळते आणि त्याचा परीणाम तुमच्या मेंदूवर होतो. योग्य प्रमाणात रक्तपुरवठा झाल्यामुळे तुमची बुद्धी तल्लख राहते.

  • पद्महस्तासन: पद्महस्तासन हा व्यायामप्रकारसुद्धा तुमच्या स्मरणशक्ती वाढवण्यासाठी चांगला आहे. तुम्हाला सरळ उभं राहून हात वर करुन तसेच कंबरेतून वाकत खाली यायचे आहे. असे करताना तुम्हाला जमिनीला हात टेकवता यायला हवा. शिवाय गुडघ्यात न वाकता तुम्हाला तुमचे डोकं तुम्हाला गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. या आसनामुळे तुमच्या मज्जासंस्थेवर ताण पडतो. शिवाय तुमच्या मेंदूला योग्य असा रक्तपुरवठा होतो. स्मरणशक्ती वाढवण्याचे उपाय करत असताना तुम्ही हे आसन करू शकता.

  • हलासन:  हलासनामध्ये तुम्हाला पाठीवर झोपायचे असते. पाय हवेत उचलून तुम्हाला ते तुमच्या डोक्यापर्यंत आणायचे असतात असे करत असताना तुमच्या मेंदूपर्यंत रक्तपुरवठा होतो. तुमच्या पाठीच्या कण्यासोबतच तुम्हाला मेंदूचे कार्य सुरळीत होण्यासाठी मदत होते. त्यामुळे तुम्ही हलासन करु शकता.

  • पद्मासन: स्मरणशक्ती चांगली राहण्यासाठी आणखी एक सोपं आसन तुम्ही करु शकता ते म्हणजे पद्मासन. पद्मासनामुळे तुमचे मन शांत होते. मन शांत झाल्यामुळे तुमच्या मेंदूवरील ताण कमी होतो. ताण कमी झाल्यामुळे तुमचं डोकं शांत राहतं. त्यामुळे तुम्ही पद्मासन अगदी घरच्या घरी आणि कधीही करु शकता. पद्मासन करत असताना तुम्ही ओमकार म्हटला तरी चालू शकेल.

तर मग विचार कसला करताय, लवकरात लवकर वरील योगासनांचा सराव करायला सुरवात करा. पण सुरवात करताना योगासनांमधील तज्ञ् व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यायला विसरू नका. नाहीतर फायद्यापेक्षा तोटाच जास्त व्हायचा!