Causes of tooth decay in children

मुलांचे दात किडण्यापाठीमागची कारणे

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आजकाल खूप लहान वयातील मुलांचे दात हे किडलेले दिसतात . साधारण लहान वयातील मुलांचे दात हे दुधी असतात .  सुरुवातीला कोवळे असलेले हे दात हे काही काळाने खूप कठीण बनतात. कोवळ्या दातांना तर लगेच कीड लागते . कारण त्या दातांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यांच्या दुधाच्या दातांची खूप काळजी घ्यावी लागते. साधारणपणे वयाच्या ११ वर्षापर्यंत मुलाना दुधाचे दात असतात . अश्या वेळी आपल्या मुलांच्या आहारात जास्त करून गोड पदार्थ याचा समावेश केला जाऊ नये .   तसेच अजून कोणकोणत्या उपाययोजना करू शकता ते  पाहूया …

लहान मुलांचा आहार हा जास्त करून गोडच असतो. तसेच सतत कोणते ना कोणते पदार्थ खाणे , आईसक्रीम , कॅटबरी तसेच इतर गोड पदार्थ खाण्याने लहान मुलांना दाताच्या समस्या या जास्त जाणवतात. तसेच कोणताही पदार्थ खाल्यानंतर त्यांना चूळ भरण्याची सवय हि जास्त नसते . दात किडतात म्हणजे काही वेळेला दातांचा रंग सुद्धा बदलतो. त्यांचे दात हे पिवळसर दिसायला सुरुवात होते . तसचे दात किडायला सुरुवात होते . अशा वेळी दातांच्या दुखण्याच्या समस्या या जास्त जाणवतात. मुलाना दाताने काहीतरी चावण्याची इच्छा हि खूप निर्माण होते . मुले हि खूप चिडचिडी बनतात.

दुधाचे दात कीडण्याची कारणे—

दातांच्या समस्या या वाढण्यापाठीमागची  कारणे म्हणजे जीवतंतूं  .  तोंडात यांचे प्रमाण जास्त असेल तर  दातांच्या समस्या वाढू लागतात. मुलांनी काही पदार्थ खाल्ले तरी त्याने लगेच चूळ भरली गेली पाहिजे . अश्या वेळी मुलांच्या तोंडात ऍसिड निर्माण होते. आणि त्यामुळे दातांमध्ये जे काही कॅल्शियम असते . कमी कमी होण्यास सुरुवात होते . त्यामुळे दातांच्या फटींमध्ये घाण अडकून त्यामध्ये कीड निर्माण होते. लहान मुलांनी कोणतेही पदार्थ खाल्यानंतर कमीत कमी ओल्या फडक्यांच्या मदतीने त्याचे तोंड पुसले जावे . तसेच त्यांना जास्त प्रमाणात चॉकलेट दिले जाऊ नये . त्यामुळे त्यांना जास्त प्रमाणात दातांच्या समस्या या निर्माण होतात. नेहमी सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेला दातांना ब्रश करायला लावा.  या प्रकराची काळजी घेतली असता,   दात हे  व्यवस्थित राहण्यास मदत होते.