सावधान!!! कोरोनानंतर कहर म्युकरमायकोसिसचा; डोळे होत आहेत निकामी

हॅलो आरोग्य ऑनलाईन : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रभर हाहाकार माजवला असतानाच आता नव्या एका आजाराने डोकं वर काढलं आहे. दिवसेंदिवस म्युकरमायकोसिस आपले विक्राळ रूप दाखवू लागला आहे. या आजाराचे काही रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. मधुमेहाची व्याधी असणाऱ्या रूग्णांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना म्युकर मायकाॅसिसचा (mucor mycosis) या बुरशीजन्य आजाराची लक्षणे दिसुन येत आहेत. वेळीच निदान करून त्यावर उपचार सुरू केले तर असा रूग्ण लवकर बरा होऊ शकतो. पण परिस्थिती हाताबाहेर गेली तर मात्र रूग्णाला वाचविता येत नाही. कोविड मधून बरे झालेल्या मधुमेहाची व्याधी असणाऱ्या रूग्णांमध्ये तोंडात वरच्या टाळूवर जखम होणे, डोळ्याला सुज येणे, दात पडणे , नाकामध्ये जखम होणे अशी लक्षणे दिसू लागतात. या जखमांमध्ये बुरशी सारखा भाग दिसतो. तो खरवडून काढावा लागतो. रूग्णातील हा प्रसार त्याच्या कवटी आणि नंतर मेंदू पर्यंत पसरून रूग्ण दगाऊ शकतो. बुरशीजन्य पदार्थांचे प्रमाण जास्त झाल्यास रूग्णांचे दात,नाक, डोळे हे अवयव काढून टाकावे लागतात. एवढी या आजाराची भयानकता आहे.

या रूग्णांना Amphotercin B हे इंजेक्शन दिले जातात. मायकाॅसिसच्या प्रादुर्भावानुसार एका रूग्णाला शंभर इंजेक्शन लागू शकतात. त्याची किंमत किमान तीन लाख रुपयांपर्यंत जाते.मात्र, अशा रूग्णांनी आणि नातेवाईकांनी वेळीच नाकातून नमुना घेऊन निदान केले तर लवकर इलाज करून रूग्ण पुर्णपणे बरा होऊ शकतो. म्युकर मायकाॅसिस धमणीला ब्लाॅक करतो त्यामुळे त्यापुढील अवयवांचा रक्त पुरवठा बंद होतो. या रूग्णांना उपचारासाठी लागणारे Amphotercin B ह्या एका इंजेक्शनची किंमत तीन हजार रुपये आहे. वेगवेगळ्या कंपन्यांनी त्याचे दर कमी केल्यास रूग्ण आणि नातेवाईकांना दिलासा मिळेल असा आशावाद डाॅ इंदोरवाला यांनी व्यक्त केला आहे. म्युकर मायकाॅसिस हा आजार संसर्गजन्य नाही. करोनातून बरे झालेल्या अनेक रुग्णांना म्युकर मायकोसिस या फंगल इन्फेक्शनचा त्रास सहन करावा लागत आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर हे खूपच मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. नागपूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यात या आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्यानंतर मुंबई जवळच्या ठाण्यातही एका रुग्णांचा म्युकर मायकोसिसचं निदान झालं आहे.

५६ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली होती. या महिलेवर ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान तिच्या उजव्या डोळ्याची हालचाल होत नसल्याचं समोर आलं. तसंच, डोळाही लाल झाला होता. यावेळी डॉक्टरांनी नेत्र विभागाशी संपर्क करुन रुग्णाची तपासणी केली. महिलेच्या काही चाचण्यांचे अहवाल आल्यानंतर रुग्णाच्या उजवा डोळ्याच्या मास पेशींना सूज आल्याचं दिसून आलं तसंच, सायनसमध्येही सूज असल्याचं निष्पन्न आलं. ही सर्व लक्षणं म्युकरमायकोसिसचा या आजाराची असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत. करोनामुक्त होऊनही म्युकरमायकोसिसचा धोका वाढू लागला आहे.

म्युकरमायकोसिसचा धोका कोणाला?

कोरोना उपचारादरम्यान हाडांच्या पोकळी मध्ये म्युकरमायकोसिस हे फंगल इंफेक्शन वाढत असून याचा परिणाम थेट डोळे, मेंदू यावर होतो. करोना उपचारादरम्यान वापरण्यात येणाऱ्या स्टेरॉईडससारख्या औषधांमुळे रुग्णाच्या शरीरात हा संसर्ग वाढत असून याचा सर्वात मोठा धोका अनियंत्रित मधुमेह आणि रोग प्रतिकारकशक्ती कमी असलेल्या रुग्णांना आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये म्युकरमायकोसिसचा संसर्ग अतिवेगाने वाढत असून वेळेत उपचार न केल्याने डोळे गमवावे लागल्याच्या अनेक घटना घडत आहेत.

करोनातून बरे झालेल्या अनेक रुग्णांना म्युकर मायकोसिस या फंगल इन्फेक्शनचा त्रास सहन करावा लागत आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर हे खूपच मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. म्युकरमायकोसिसमुळे डोळ्यांवर परिणाम होऊन अंधत्व येणे, डोळा गमावावा लागणे तसेच मेंदूपर्यंत संसर्ग वाढल्यास प्रसंगी जीव गमावण्यासारख्या गंभीर घटना घडत असून म्युकरमायकोसिसचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने डोळ्यांशी संबंधित लक्षणे दिसत असून डोळ्यांना सूज येणे, लाल होणे, दृष्टी कमी होणे, सतत डोळ्यांतून पाणी येणे आदी लक्षणे आढळत आहेत. या संसर्गाचे वेळेत निदान व्हावे यासाठी सदर लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ कान, नाक, घसा तज्ञांकडून तपासणी करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.

उपचार महागडे

या संसर्गावर ॲम्फोटेरिसिन बी या इंजेक्शनच्या वापराने इलाज करता येतो. मात्र हे औषध महाग असून आज ज्याप्रमाणे रेमेडीसीवर औषधाचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत आहे तशीच परिस्थिती येत्या काळामध्ये ॲम्फोटेरिसिन बीसाठी होऊ शकते.