| | |

सावधान!!! कोरोनापासून बचावासाठी सॅनिटाईजरचा वापर करताय? ‘हे’ आहेत तोटे

हॅलो आरोग्य ऑनलाइन । जवळपास दीड वर्षापूर्वी कोरोना जन्म चीनमधल्या वुहान शहरात झाला. जगभरात थैमान घालणारा कोरोना भारतातही पोहोचला. नेहमीप्रमाणे आपल्याकडे याला कोणीही गांभीर्याने घेतले नाही. पण जसजसा कोरोना बाधितांच्या मृत्यूचा आकडा वाढू लागला तसे मग सरकारपासून वैयक्तिक पातळीपर्यंत विलगीकरण, स्वच्छता याचे महत्व लोकांना पटू लागले. मास्क घालणे, संवाद साधताना ठराविक – योग्य ते अंतर ठेवणे, स्वच्छतेसाठी साबण किंवा सॅनिटाईजरने हात धुण्याचा सल्ला दिला गेला. याचा अर्थ असा नाही की लोकांना हात धुण्याचे महत्व माहीत नव्हते, होते पण कोरोनामुळे हात साबणाने धुणे, किंवा सॅनिटाईजर वापरणे याला आणखीन महत्व प्राप्त झाले. पण जशीही कोरोंनाची बातमी व्हायरल झाली तसं लोकांनी सॅनिटाईजरवर उड्या मारल्या आणि अनेक दुकानातून माल संपला. बनावटी सॅनिटाईजरचा काळाबाजार होत असल्याचंही निदर्शनास आले आले होते. शिवाय, करोना व्हायरसपासून (Covid-19) संरक्षण व्हावं यासाठी हँड सॅनिटायझरचाही प्रचंड प्रमाणात वापर केला जात आहे. अधिक सावधगिरी बाळगण्यासाठी लोक थोड्या-थोड्या अंतरानं सॅनिटायझरचा उपयोग करून हात स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक ठिकाणी साबण – पाण्यानं हात स्वच्छ धुणे अशक्य आहे. यामुळे खबरदारी म्हणून हँड सॅनिटायझरचा वारंवार वापर होत आहे. अशा परिस्थितीत स्वच्छता राखण्यासाठी, आपल्याला हातांची काळजी घेण्यासाठी फक्त सॅनिटायझरची आवश्यकता नाही. कारण सॅनिटायझरपेक्षा साबणाचे फायदे अनेक पटीने आहेत. गड्या आपुला साबण बरा. हो..जाणून घ्या कसं.


विशेषज्ञांनी केलेल्या संशोधनातून हे समोर आलं आहे की, कोरोना व्हायरसपासून बचावासाठी साबण हा उत्तम पर्याय आहे. साबण या व्हायरसमधील लिपिडचा आरामात नाश करतं. खरंतर साबणामध्ये फॅटी एसिड आणि मीठासारखी तत्त्वं असतात. ज्याला एंफीफाइल्स असं म्हटलं जातं. साबणातील ही तत्त्वं व्हायरसच्या बाहेरील आवरणाला निष्क्रिय करतात. पण यासाठी तुम्ही किमान 20 सेकंड हात धुण्याची गरज आहे. ज्यामुळे हा चिकट पदार्थ नष्ट होतो. जो व्हायरसला तुमच्या हातावर चिकटवून ठेवतो. तुम्हाला अनेकवेळा साबणाने हात धुतल्यावर हे जाणवलं असेल की, साबणाने हात धुतल्यानंतर त्वचा कोरडी पडते आणि हाताला सुरकुत्या पडतात. हे यामुळे होतं कारण साबणामध्ये खोलवर जाऊन किटाणु मारण्याची क्षमता असते.

सॅनिटाईजर साबणांएवढं प्रभावी का नाही?
सॅनिटाईजर हे नेहमी जेल किंवा क्रिमच्या रूपात असतं. कोरोनाशी लढण्यासाठी सॅनिटाईजर उत्तम पर्याय नसल्याचंही समोर आलं आहे. कोरोनाचा सामना फक्त तेच सॅनिटाईजर करू शकतात ज्यामध्ये अल्कोहोल जास्त प्रमाणात असेल. तसंच वारंवार सॅनिटाईजरचा वापर हा तुमच्या शरीरासाठी चांगला नसतो. कारण सॅनिटाईजर तुमच्या त्वचेतून रक्तापर्यंत पोचून पेशी आणि त्वचेचं नुकसान करू शकतो. त्यामुळे सामान्यपणे आपल्या वापरात असलेला साबण हा जास्त चांगला पर्याय आहे. कोरोनापासून बचावासाठी योग्य पद्धतीने हात धुवावा. किमान 20 सेकंड्स हात धुवा. पण हात धुत असताना पाण्याचा अपव्यय टाळा.