holi

शासनाच्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करून यंदाची होळी करा साजरी

हॅलो आरोग्य ऑनलाईन । मार्च महिन्यांमध्ये सण आणि सभारंभ असतात. त्या महिन्यात होळीचा सण साजरा केला जातो. होळीच्या सणाच्या दिवशी सगळीकडे वेगवेगळ्या रंगाच्या साह्याने आणि गुलालाचा मदतीने हा सण साजरा केला जातो. पण कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे या वर्षीची होळी हि अगदी साध्या पद्धतीने साजरी करावी असे शासनाने आवाहन केले आहे .

गेल्या मार्च मध्ये आलेला जागतिक कोरोना हा अजूनही भारतात आपली मुळे रोवून बसला आहे . कोरोनाच्या महामारीमुळे अनेक लोकांचे जीवन हे उध्वस्त झाले आहे . अनेक लोकांचे प्राण गेले आहेत . गेल्या एक वर्षांपासून कोणताच सण आणि उत्सव हा आनंदाने साजरा झाला नाही. हा आजार संसर्गजन्य असल्याने आपल्या आरोग्याच्या दृष्टीने कोरोनापासून लांब राहणेच आवश्यक आहे . त्यासाठी या वर्षीची होळी सुद्धा साध्या पद्धतीनेच साजरी करावी .

कोविडच्या अनुषंगाने यावर्षी सर्व धर्माचे सण, उत्सव मोठ्या स्वरुपातील कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत. कोणताही सण किंवा सभारंभ हा साध्या पद्धतीने साजरा करण्यासाठी शासनाने अनेक मार्गदर्शन सूचना जारी केल्या गेल्या आहेत. त्या नियमांचा वापर करूनच होळी हि खेळली जावी . अनेक ठिकाणी होळी खेळली जाते. होळी हि वेगवेगळ्या रंगाच्या मदतीने खेळली जाते. पण यावर्षी पाण्याचा वापर न करता हा सण साजरा केला जावा . यावर्षी कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता अनेक लोकांना एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पाच पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकत नाहीत. तसेच आजूबाजूला होळी खेळताना मास्क चा वापर करणे गरजेचे आहे . होळी हि घरातल्या घरातच साजरी केली जावी. कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीच्या संपर्कात न येण्याची काळजी प्रत्येकाने घ्यावी असे शासनाच्या आदेशात म्हंटले आहे .