holi

यंदाची होळी अशी करा साजरी

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  कोरोनाच्या   वाढत्या प्रभावामुळे  होळी हि  साध्या पद्धतीने साजरी करावी लागत आहे.  कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा जगभरात पसरत आहे. मार्च महिना हा सगळा सणासुदीचा उत्सव आहे . त्या काळात  अनेक सण असतात. लोकांनी होळी खेळणे आवडते.  पण   आजूबाजूचे वातावरण पाहता होळी खेळणे  खूप  अवघड आहे .  यंदाची होळी खेळताना कशी  साजरी केली जावी याची माहिती देणार आहोत .

— होळीमध्ये खेळताना कमीत कमी मास्क आणि हॅन्ड ग्लोज याचा वापर करा.  यावर्षी कोरोनाचा प्रभाव हा वाढत चालला आहे. त्यामुळे  यंदाची होळी  काळजी    घेऊनच  खेळावी. खेळताना जास्त प्रमाणात रासायनिक पदार्थांचा वापर केला जाऊ नये. सामाजिक अंतर राखून होळी खेळल्याने कोरोनाचा प्रभाव वाढणार  नाही.  तसेच शासनाच्या  प्रत्येक  नियमांचे पालन करणे आवश्यक आहे .  त्यामुळे आपण देखील सुरक्षित राहाल. यंदा कोरड्या रंगाने होळी खेळा. जास्त प्रमाणात पाण्याचा वापर केला जाऊ नये . पाणी जास्त वापरल्याने कदाचित सर्दी , खोकला , शिंका  या समस्या वाढू शकतात.

— डिजिटल होळी कोरोनाच्या संसर्गामुळे आपण यंदा डिजिटली होळी खेळू शकता. यासाठी कुटुंब आणि मित्रांशी चर्चा करून एकाच वेळी व्हिडीओ कॉलिंग अप्स वरून आपण होळीच्या शुभेच्छा द्यावे. या वेळी आपण एक छोटेसे कार्यक्रम देखील ठेवू शकता. होळीसाठी कलर थीम ठेऊ शकता. जेणे करून सर्वजण रंगबेरंगी दिसतील.

— कोरोनाच्या काळात आपली काळजी घेणे फार गरजेचे असते . जरी तुम्ही बाहेर जाऊन होळी खेळू शकत नसाल तर त्यावेळी मात्र घरातल्या घरात व्हिडीओ बनवून आपल्या जवळच्या लोकांना शुभेच्छा देऊ शकता. कोरोनाच्या काळात हीच सर्वात मोठे गिफ्ट असू शकते .

— या दिवशी आपण ऑनलाईन आपल्या मित्र कुटुंबियांसह स्पर्धा ठेऊ शकता.यामध्ये अंताक्षरी, कविता, फॅन्सी ड्रेस, काहीही स्पर्धा ठेवू शकता.असं केल्याने आपण सर्व एकत्ररित्या काही वेळ घालवू शकता आणि होळीचा सण साजरा करू शकता.