| | |

एक मनुका चघळा आणि जंक फूड खाणं विसरा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकाल घरच्या जेवणापेक्षा बाहेरचे जेवण जास्त रुचकर म्हणणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अनेकांना डाळ, भात, भाजी, चपाती खाणे फारसे रुचत नाही. पण पिझ्झा, मोमोज, चाउमीन, बर्गर या पदार्थांची नुसती नाव जरी ऐकली तरीही ते खाण्याची इच्छा होते. परिणामी आपण पौष्टिक, सात्विक आहारापासून अंतर राखतो आणि जंक फूड खाण्यात धन्यता मानतो. अगदी या सर्व गोष्टी आरोग्यासाठी किती हानिकारक आहेत हे माहीत असूनही आपण याच पदार्थांकडे ओढले जातो. हे पदार्थ खाण्याची लालसा इतकी मोठी असते कि आपण आपले नियंत्रण गमावतो आणि स्वतःच्या हाताने स्वतःचे नुकसान करून घेतो.

मित्रांनो जर तुम्हीही अश्याच व्यक्तींपैकी एक असाल तर वेळीच सावध व्हा आणि आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. अन्यथा शरीर वरच्यावर फुगीर आणि आतून पोकळ होण्यास सुरुवात होईल. शिवाय यामुळे वाढणारे वजन पुन्हा नियंत्रणात आणणे कठीण होऊन जाईल. म्हणून अश्या लालसेवर जर नियंत्रण मिळवायचे असेल तर दररोज मनुके खा. होय. जर तुम्हाला बाहेरच्या जेवणाची सतत तलफ जाणवत असेल तर असे जाणवल्यास एक मनुका घ्या आणि तो हळू हळू चघळत रहा. हे थोडं ऐकायला विचित्र आहे पण फायदेशीर आहे. कारण मनुका खाल्ल्याने मेंदूतील लालसा निर्माण करणारे रसायन बाहेर पडण्यास मदत होते.

० मनुक्याचे कार्य – कमी कॅलरी आणि पोषक तत्वांनी भरलेले मनुका हा मध्यान्हादरम्यानचा एक उत्तम नाश्ता आहेत. शिवाय यात नैसर्गिक गोडवा आणि लेप्टिन आहे. हे गुणधर्म भूक कमी करणारे आहेत. मनुका खाल्ल्याने दीर्घकाळ समाधान आणि पोटभर राहण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, लेप्टिन थर्मोजेनेसिस प्रक्रिया वाढवून चरबी पेशी नष्ट करू शकते. यात गामा – एमिनोब्यूट्रिक एसिड (GABA) म्हणून ओळखले जाणारे शक्तिशाली न्यूरोट्रांसमीटर आहेत जे भूक कमी करू शकतात, पचन कमी करू शकतात आणि तणाव कमी करू शकतात.

० मनुका कशा खाल्ल्यास फायदा होतो?
– सर्व प्रथम एक मनुका घ्या. पाण्याखाली स्वच्छ धुऊन आता मनुक्यावर लक्ष केंद्रित करा. जोपर्यंत आपली सर्व लालसा मनुक्यावर केंद्रित होत नाही तोपर्यंत मनुक्याकडे पाहत रहा. यानंतर मनुका जिभेवर ठेवा आणि त्याची चव चाखत खा. त्याच्या चवीकडे लक्ष देत साधारण ५ मिनिटे मनुका चघळत रहा. यामुळे तुम्हाला भूक लागणार नाही वा जंक फूडही खावेसे वाटणार नाही.

० फायदे –

१) जंक फूड खाण्यावरून मन उडेल.

२) मन आनंदी राहील आणि प्रसन्न वाटेल.

३) दिवसभर शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत होईल.

४) ताण आणि तणाव मुक्त जगण्यास सहाय्य मिळेल.

५) तोंडाची चव खराब होत नाही.