|

चिकुनगुनिया होऊन गेला पण सांधेदुखी काही गेली नाही; जाणून घ्या घरगुती उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन। चिकुन गुनियाचा ताप अतिशय त्रासदायक असतो. हा आजार माणसाचे शरीर अगदी पिळवटून काढतो. या तापत ग्लानी आणि कमकुवतपणा जाणवतो. तर अनेक रुग्णांमध्ये एक बाब दिसून आली आहे ती म्हणजे, चिकुन गुनियापासून मुक्ती मिळाल्यानंतरही त्या रुग्णांच्या सांध्यातील वेदना काही गेल्या नाहीत. अगदी एक आठवड्यापासून ते महिनाभर या त्रासाने रुग्ण ग्रासलेले होते. सर्वसाधारणपणे चिकुनगुनिया झाला असताना सांधेदुखी होणे हि सामान्य बाब आहे. मात्र हा आजार होऊन गेल्यानंतरही हि समस्या कायम राहणे त्रासदायक आहे.

चिकुनगुनियाचा विषाणू हा एक विशिष्ट डासाच्या चाव्यामूळे आपल्या शरीरात प्रवेश करतो. हा विषाणू थेट आपल्या सांध्यांवर हल्ला करतो. त्याची वेदना इतकी तीव्र असते कि रुग्णाला उठता आणि बसताही येत नाही. शिवाय हा विषाणू शरीरात गेल्यावर अशक्तपणा, डोकेदुखी, उलट्या आणि मळमळ होण्याची तक्रार जाणवते. चिकुनगुनियातुन बरे झाल्यानंतरही अनेकदा सांधेदुखी काही दिवसांकरिता राहते. पण आपल्या सांध्यातील वेदना या महिनाभरापेक्षा अधिक काळ कायम राहिली असेल तर या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही खालील घरगुती उपाय करून पहा:-

१) सुकलेली द्राक्ष खा – चिकुनगुनियाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी गाईचे दूध आणि त्यासवबत बिया नसलेली सुकलेली द्राक्ष खाण्याचा फायदा मिळतो. या मिश्रणाच्या सेवनाने चिकुनगुनियाचे विषाणू मारले जातात. परिणामी सांध्यांना हळूहळू आराम मिळतो.

२) गाजर – चिकुनगुनियाच्या त्रासात केशरी आणि लाल गाजर खाणे फायदेशीर आहे. कारण यांपैकी कोणतेही गाजर असेच चावून खाल्‍याने वा त्याचा रस प्यायल्याने शरीराची चिकुनगुनियाच्‍या विषाणूशी लढण्याची ताकत वाढते.

३) बर्फाचा शेक – सांध्यांच्या दुखण्यावर बर्फाचा शेक अतिशय लाभदायी असतो. म्हणून चिकुनगुनियामुळे होणाऱ्या सांध्यातील वेदनांवर बर्फाचा शेक द्या. यासाठी टॉवेलमध्ये बर्फ ठेऊन सांधे दुखणाऱ्या भागावर ठेवल्यास आराम मिळतो.

४) अश्वगंधा पावडर – अश्वगंधा पावडरचे गायीच्या दुधातून सेवन केल्यास चिकुनगुनियामुळे होणाऱ्या सांधेदुखीपासून आराम मिळतो. कारण अश्वगंधा पावडरमध्ये स्नायूंना बळ देण्याची शक्ती असते.

५) लसूण पेस्ट – चिकुनगुनियामुळे होणाऱ्या वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी लवंगाच्या तेलात लसणाची पेस्ट मिसळून सांध्यांवर लावा. यानंतर गरम पाण्याने शेक द्या. असे केल्यास आराम मिळतो.

६) व्यायाम करणे – चिकुनगुनियामूळे होणाऱ्या सांध्यांच्या वेदनांवर सर्वोत्तम उपाय म्हणजे स्नायू मोकळे करणे आणि यासाठी व्यायाम करणे खूप प्रभावी आहे. म्हणून नियमित व्यायाम करा. यामुळे सांधेदुखी कमी होऊ शकते.

७) ऑइल मसाज – नारळाच्या वा तिळाच्या तेलाने सांध्यांचा मसाज करा. असे केल्याने चिकुनगुनियामूळे होणाऱ्या सांध्यांच्या वेदनांवर फायदा होतो. याशिवाय आपण नारळाच्या पाण्याचे सेवनदेखील करू शकता.