Cholesterol Control
| | |

Cholesterol Control : ‘हे’ पदार्थ करतील बॅड कोलेस्ट्रॉल कंट्रोल; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकाल कोलेस्ट्रॉल वाढणं अतिशय सामान्य बाब झाली आहे. पण ही सर्वसाधारण वाटणारी बाब अतिशय गंभीर आहे. हे कॉलेस्ट्रॉल का वाढत..? तर याचे मुख्य कारण म्हणजे अनहेल्दी फूड आणि सुस्त जीवनशैली. या कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार असतात. 1) गुड कोलेस्ट्रॉल (Good Cholesterol) 2) बॅड कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol)

यातील गुड कोलेस्ट्रॉल कोशिका निर्माण आणि व्हिटॅमिनसह बॅलन्स हार्मोन्स तयार करण्यासाठी मुख्य भूमिका निभावतात. म्हणजेच गुड कोलेस्ट्रॉल शरीरासाठी आवश्यक आहे. पण बॅड कोलेस्ट्रॉलमूळे शरीरात वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. जसे कि हार्ट अटॅक येणे. जाणून घेऊया अधिक माहिती खालीलप्रमाणे (Cholesterol Control) :-

० बॅड कोलेस्ट्रॉलमूळे (Bad Cholesterol) हार्ट अटॅक कसा येतो..?

शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल जमा होणे ही बाब अतिशय गंभीर आहे. कारण बॅड कोलेस्ट्रॉलमुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. यामध्ये होत असं कि, बॅड कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊन रक्तप्रवाहाचा मार्ग ब्लॉक करते. ज्यामूळे शरीरात रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही. यामुळे हार्ट अटॅक आणि हाय ब्लड प्रेशरचा त्रास होतो.

‘हे’ पदार्थ बॅड कोलेस्ट्रॉल करतील कंट्रोल (Cholesterol Control Food)

विविध डाळी
जर दैनंदिन आहारात विविध डाळींचा समावेश कराल तर शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल साहजिकच शरीराबाहेर उत्सर्जित होईल. कारण डाळींमध्ये सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण फार कमी असतं. शिवाय यात कोलेस्ट्रॉल (Cholesterol Control Food) कमी करणारे फायबरही अधिक असतं.

तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींमध्ये प्रोटीनचे प्रमाण वेगवेगळे असते पण बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यासाठी प्रभावी असते. त्यामुळे आहारात विविध डाळी जरूर खा.

बदाम
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी बदाम एकदम प्रभावी आणि रामबाण उपाय ठरतो. कारण बदाम कोलेस्ट्रॉल कमी (Cholesterol Control Food) करण्यासाठी एक चांगलं आणि हेल्दी ड्राय फ्रूट आहे.

Almond

यात असणारे फॅट हे हेल्दी असल्यामुळे ते हृदयाला कोणतीही हानी पोहचवत नाहीत. उलट हृदयाची काळजी घेत.

ओट्स
वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर दैनंदिन आहारात ओट्सचा समावेश जरूर करा. कारण ओट्सचे नियमित सेवन केले तर कोलेस्ट्रॉल कमी होते. (Cholesterol Control Food)

Oats

सोबतच शरीराला इतरही आरोग्यदायी फायदे मिळतात. त्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल घटवण्यासाटी ओट्स खाणे फायदेशीर आहे.

व्हेजिटेबल ऑइल
व्हेजिटेबल ऑईलमधील ओमेगा – 3 फॅटी ऍसिडस हे रक्त वाहिन्यांमधील प्लेग रोखण्यास मदत करते. त्यामुळे हृदय विकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो.

यात ओमेगा- ३ ने समृद्ध अॅव्होकॅडो, कॅनोला, फ्लेक्ससीड, ऑलिव्ह, शेंगदाणे, सूर्यफूल आणि अक्रोड तेलांचा समावेश आहे. त्यामुळे यांपैकी कोणतेही तेल आहारात वापरणे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. (Cholesterol Control Food)

महत्वाचे म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल (Cholesterol Control) शिवाय जर अन्य कोणताही आरोग्यविषयक त्रास असेल जसे कि मधुमेह, हाय बीपी तर आहारात बदल करताना आधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.