Cholesterol Diet
| |

Cholesterol Diet : शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल ‘या’ 4 पदार्थांमुळे होईल कमी; आजच करा आहारात समावेश

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत, ज्यांना कोणत्या ना कोणत्या समस्या सतावत असतात. हाय ब्लड प्रेशर, युरीन इन्फेक्शन, पोट दुखी, कंबर दुखी, डोळ्यांचे आजार, हाडाचे आजार, हृदय विकार असे विविध आजार आपल्या पाठलाग सोडत नाही परंतु आपले शरीर निरोगी राहण्यासाठी हृदयाचे आरोग्य देखील उत्तम असणे गरजेचे आहे. जर तुमचे आरोग्य चांगले असेल तर शरीरातील अन्य अवयव देखील उत्तम कार्य करतात याकरिता कोलेस्ट्रॉल अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. मानवी शरीरामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल आणि चांगले कोलेस्ट्रॉल पाहायला मिळते. तुमच्या शरीरामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल वाढले तर विविध आजार होण्याची शक्यता असते. विशेषतः हृदयरोग उद्भवण्याची शक्यता जास्त असते म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तुमच्या स्वयंपाक घरातील अशा काही पदार्थांचा (Cholesterol Diet) उपयोग सांगणार आहोत, ज्या पदार्थांचा वापर करून तुम्ही तुमच्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल दूर करू शकतात आणि तुमचे शरीर निरोगी राखु शकता चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

lahsun

१) लसूण

लसूणचा उपयोग स्वयंपाक घरामध्ये प्रामुख्याने केला जातो. लसूण ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती देखील आहे. जी मानवी शरीरासाठी आरोग्यवर्धक मानली जाते. जर आपण नियमितपणे एक ते दोन लसूणच्या पाकळ्या सेवन केल्या तर आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते, म्हणूनच प्रत्येकाने लसूणचे सेवन करायला हवे. जर तुम्हाला कच्चा लसूण खायला शक्य होत असेल तर अतिशय उत्तम अन्यथा तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांमध्ये लसूणची पेस्ट देखील बनवून टाकू शकता.

Walnuts
Walnuts

२) अक्रोड- (Cholesterol Diet)

आपण नेहमी सुकामेवा खात असतो. या सुकामेवा मध्ये काजू, बदाम, पिस्ता, मनुके सोबतच अक्रोडचा देखील समावेश केला जातो. अक्रोड खाल्ल्याने रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले बॅड कोलेस्ट्रॉल निघून जाते तसेच शरीरातील रक्त प्रवाह सुरळीमध्ये राहतो परिणामी सर्व अवयवांना रक्तांचा पुरवठा योग्य प्रमाणात होत असल्याने कोणत्याही प्रकारचे त्रास शरीराला होत नाही म्हणूनच सकाळी उठल्यावर तीन ते चार अक्रोड नियमितपणे सेवन करायला हवे यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात राहील.

Fenugreek water

३) मेथीचे पाणी –

आपल्या घरामध्ये मेथी सहज उपलब्ध असते. मेथीचे वेगवेगळे पदार्थ देखील बनवले जातात. रात्री झोपताना तुम्ही एक चमचा मेथी एक ग्लास पाण्यामध्ये भिजवून सकाळी उपाशीपोटी सेवन केले तर तुम्हाला खूप सारे लाभ होऊ शकतात. मेथी मध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे तुमच्या शरीरातील विषारी घटक बाहेर तर काढतात पण त्याचबरोबर शरीरामध्ये वाढलेले कोलेस्ट्रॉल देखील कमी (Cholesterol Diet) करतात म्हणूनच भिजवलेली मेथी व पाणी सेवन करणे गरजेचे आहे.

oats

४) ओट्स-

शरीराला पोषक तत्त्वांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते, अशावेळी आपण ओट्सचा समावेश आहारामध्ये केला तर आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी (Cholesterol Level) नियंत्रणात राहू शकते. ओट्स मध्ये ग्लुकोन नावाचा घटक उपलब्ध असतो, ज्यामुळे आपल्या शरीरातील आतड्यांची स्वच्छता होते. या काही पदार्थांचा समावेश तुम्ही तुमच्या आहारामध्ये केला तर कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमीत होईल पण त्याचबरोबर तुम्हाला नियमितपणे व्यायाम देखील करायचा आहे. नियमितपणे व्यायाम केल्याने तुमच्या शरीरातील विषारी घटक घामाच्या माध्यमातून बाहेर पडतात व शरीर देखील मजबूत आणि फिट राहते, परिणामी डॉक्टरांकडे जाण्याची गरज निर्माण होत नाही.