| |

त्वचेच्या प्रकारानुसार साबणाची निवड करा; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। एक गोष्ट प्रत्येकाने कटाक्षाने पाळली पाहिजे ती म्हणजे, आपल्या शरीरासोबत आपल्या त्वचेचीसुद्धा काळजी घेणे गरजेचे आहे. आपली त्वचा कोमल आणि सुंदर दिसावी म्हणून आपण अनेकदा विविध महागडी बाजारात उपलब्ध असणारे शॉवर जेल, फोम आणि बॉडी वॉश अशा विविध पर्यायांचा अवलंब करतो. यामुळे बऱ्याच घरांमध्ये साबण कमी प्रमाणात वापरला जातो. कारण साबणाच्या वापराने त्वचा कोरडी पडते, असे निदर्शनास येते. पण खरंतर साबणामुळे त्वचा कोरडी होत नाही. यासाठी तुम्ही जर त्वचेच्या प्रकारानुसार साबण निवडलात तर त्या साबणाचा त्वचेला त्रास होत नाही. म्हणूनच आज आम्ही सांगणार आहोत कि कोणत्या त्वचेसाठी कोणता साबण योग्य आहे.

  • सामान्य त्वचा – सामान्य त्वचेवर कोणत्याही प्रकारचा साबण सूट करतो. पण या व्यक्तींनीही मॉईस्चराईजरयुक्त साबण वापरल्यास त्यांची त्वचा अधिक कोमल आणि मुलायम राहण्यास मदत मिळते. पण इतर साबणांमुळे मात्र यांना त्वचेला कोणताही त्रास होत नाही. असे असले तरीही सामान्य त्वचा असणाऱ्या व्यक्तींंनी सातत्याने साबण बदलणे योग्य नाही. शिवाय आपण कोणता साबण वापरतोय आणि किती महिने वापरतोय याबाबतची माहिती ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
  • कोरडी त्वचा – ज्यांची त्वचा अतिशय कोरडी आहे त्याची मॉईस्चराईजयुक्त साबणाचा वापर करावा. त्यामुळे कोरडी त्वचा आहे त्याहून अधिक कोरडी होणार नाही. शिवाय त्वचा मुलायम आणि मऊ राहील. यामुळे त्वचेमधील ओलावा टिकण्यास मदत मिळते. त्यामुळे आपली त्वचा कशी आहे त्यानुसारच साबण निवडावा. बाजारात अगदी सहजपणे मॉईस्चराईजयुक्त साबण मिळतात. त्यामुळे या साबणाची उपलब्धता असते.
  • तेलकट त्वचा – तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्हाला नॉर्मल अर्थात साध्या साबणाचा वापर करणे गरजेचे आहे. बाजारामध्ये तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी खूप साबण उपलब्ध आहेत. त्यापैकी कोणताही साबण त्यावरील घटक वाचून तुम्ही खरेदी करू शकता. तसेच त्वचा तेलकट असल्यास तुम्ही लिंबू अथवा ग्लिसरीनयुक्त साबणदेखील वापरू शकता. यामुळे तुमची त्वचा अधिक मऊ राहण्यास आणि तेलकटपणा नियंत्रित करण्यास मदत मिळते.
  • संवेदनशील त्वचा – जर तुम्हाला तुमच्या त्वचेची काळजी नीट घ्यायची असेल, तर तुम्ही अँटिबॅक्टेरियल साबण वापरू शकता. अँटिबॅक्टेरियल साबण वापरल्याने शरीरावर कोणत्याही प्रकारच्या पुळ्या, रॅशेस आणि खाजेच्या समस्या उदभवत नाहीत. तसेच तुमची त्वचा जर तेलकट असेल तर असा साबण नक्की वापरा. यामुळे तुमची तेलकट त्वचा अधिक चांगली राहण्यास मदत मिळते. अनेकांना साबणाची ऍलर्जी असते. त्यांच्यासाठी असे अँटिबॅक्टेरियल साबण अगदी लाभदायक असतात. मुळात हे साबण संवेदनशील त्वचेसाठीच बनविण्यात येतात. त्यामुळे संवेदनशील त्वचा असणाऱ्या व्यक्तींनी अँटिबॅक्टेरियल साबण वापरावा.